Coronavirus : ‘कोरोना’च्या भीतीनं केली आत्महत्या, कुटुंबाला सुसाईड नोटमध्ये लिहीलं – ‘तुम्ही सर्वांनी टेस्ट करून घ्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाव्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. भारतात या विषाणूमुळे होणाऱ्या मृतांच्या संख्येतही सतत वाढ होत आहे. दरम्यान, कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्याला कोरोना झाला या संशयाच्या भीतीने ५७ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली आहे, फाशी घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने सुसाइड नोटही लिहिली होती,त्यात म्हटले की, त्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि म्हणूनच तो आत्महत्या करीत आहे. तसेच, त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्यांची चाचणी करण्यास सांगितले.

कर्नाटकातील उडुपी येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीने घराबाहेर झाडावर लटकून आत्महत्या केली. दरम्यान, पोलिसांनी सांगितले कि, तो व्यक्ती त्या लोकांच्या लिस्टमध्ये नव्हता ज्यांनी घरात राहण्यास सांगितले होते. याशिवाय त्याच्यात कोरोना विषाणूची लक्षणेही नाहीत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सध्या शरीरात कोरोना विषाणू विषयी चौकशी सुरू असून पोस्टमॉर्टमदेखील होणार आहे.

दरम्यान, भारतातील कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा १५ झाला आहे. तर ६०० हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मृतांचा आकडा ४ वर पोहोचला आहे. गुरुवारी २४ मार्च रोजी एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली, ती कोरोनामुळे त्रस्त होती. महाराष्ट्रात कोविड -१९ चे दोन नवीन रुग्णांची लागण झाली. राज्यात एकूण १२४ लोक संक्रमित आहेत.