प्रत्येक मुलाला ‘ऐश्वर्या’च हवीय, पण ती फक्त एकच आहे, ‘या’ मंत्र्यानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक सरकारचे वरिष्ठ मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची तुलना अभिनेत्री ऐश्वर्या रायशी केली. ईश्वरप्पा यांनी एक विवादास्पद वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की प्रत्येक तरुणाची इच्छा आहे की त्यांना ऐश्वर्या मिळावी, परंतू ऐश्वर्या तर एकच आहे.

ईश्वरप्पा शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधत होते. या दरम्यान त्यांना विचारण्यात आले की जर अपात्र आमदार पुन्हा निवडणूकीत विजयी झाला तर त्यातील कोणा एकाला राज्याचे उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते? यावर उत्तर देताना ईश्वरप्पा म्हणाले की उपमुख्यमंत्रिपद कोणाला नको असते ? पॉवर कोणाला नको आहे. प्रत्येक मुलगा जेव्हा तरुण होतो तेव्हा तो म्हणतो की त्याला ऐश्वर्या पाहिजे, परंतू ऐश्वर्या तर एकच आहे.

सगळेच उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही
ईश्वरप्पा म्हणाले की, नेत्यांमध्ये महत्वाकांक्षा तर असते परंतू हे पूर्ण करण्यासाठी स्कोप असणे आवश्यक आहे. कारण सगळेच तर उपमुख्यमंत्री होऊ शकत नाहीत.

कर्नाटक पोटनिवडणूकीच्या निकालावर नजर
कर्नाटकच्या येडियुरप्पा सरकारमध्ये तीन उपमुख्यमंत्री आहेत. तेथे 5 डिसेंबरला पोट निवडणूका झाल्या आहेत. विधानसभेत अपात्र घोषित केलेले 15 पैकी 13 आमदार भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. याचा निकाल 9 डिसेंबरला जाहीर होईल. कर्नाटकात सत्तेत कायम राहण्यासाठी भाजपला कमीत कमी 6 जागांवर विजय मिळवणे आवश्यक आहे.

बंडखोर आमदारांचे आभार
के. एस. ईश्वरप्पा यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचे आभार मानले आहेत आणि म्हणाले की त्यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिला नसता तर कर्नाटकात भाजपचे सरकार आले नसते. कर्नाटकात विधानसभेत सध्याच्या स्थितीला 208 सदस्य आहेत. सध्या विधानसभेत एका अपक्षासह भाजपचे 105 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 66 आणि जेडीएसचे 34 आमदार आहेत. तसेच बीएसपीचे एक आमदार निवडून आले आहेत.

Visit : Policenama.com