भाजप मंत्र्याच्या अश्लील सीडीमुळे कर्नाटकात खळबळ

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – कर्नाटकच्या भाजपा सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या विरोधातील आक्षेपाहार्य सीडी एका सामाजिक कार्यकर्त्याने जारी केली आहे. यामुळे कर्नाटकात मोठी खळबळ उडाली आहे. या सीडीमध्ये रमेश जाकरीहोळ कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. या प्रकरणी जाकरीहोळ यांच्याविरोधावत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, रमेश जारकीहोळी यांनी यावर प्रतिकिया देताना हे सर्व राजकीय षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.

रमेश जारकीहोळी यांनी एका तरुणीला ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी लावतो असे सांगून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. तसेच त्यांनी या प्रकाराची सीडी मीडियासमोर आणली आहे.

या संदर्भात बोलताना दिनेश कलहळ्ळी म्हणाले, जी सीडी हाती आली आहे त्यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचे दिसत आहे. या प्रकारानंतर संबंधित तरुणीच्या कुटूंबियांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर मी स्वत आणि पीडित तरुणीचे कुटूंबीय यांनी बंगळुरुचे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. घडलेला सर्व प्रकार सांगितला. तत्काळ तक्रारही दाखल केली. या प्रकरणाचा तातडीने तपास करावा तसेच पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केल्याचे दिनेश कलहळ्ळी यांनी सांगितले.

राजकीय षड्यंत्र – रमेश जारकीहोळी
रमेश जारकीहोळी यांची आक्षेपाहार्य सीडी बाहेर आल्याने कर्नाटकाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जारकीहोळी यांनी यावर स्पष्टीकरण देताना हे सर्व राजकीय षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. हे सर्व खोटे आहे. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. सध्या याबाबात माझ्याजवळ एकच उत्तर आहे, हे राजकीय षड्यंत्र आहे, असे रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसची निदर्शने
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आक्षेपार्ह सीडी प्रकरणी मंगळवारी निदर्शने केली. यावेळी राज्यातील भाजपा सरकार आणि रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.