संतापजनक ! मराठी भाषेचे स्टेट्स ठेवल्याने चौघांना कानडी पोलिसांकडून अमानुष मारहाण

बेळगावः पोलीसनामा ऑनलाईन – WhatsApp वर मराठी भाषिक वाघ असे स्टेटस ठेवल्याने चौघांना कर्नाटक पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना बेळगावातून समोर आली आहे. या मारहाणीचे वण तरुणाच्या अंगावर उमटले आहेत. कानडी पोलिसांच्या अमानुष अत्याचारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आणखी किती दिवस कानडी जुलूमशाही सुरु राहणार ? असा संतप्त सवाल स्थानिक मराठी भाषिक विचारत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावातील मच्छे गावातील चौघांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर मराठी भाषिक वाघ असे स्टेट्स होते. त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स पाहून कानडी पोलिसांनी जाब विचारत बेदम मारहाण केली. पाठी, हात आणि पायांवर बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केली आहे. दरम्यान, कोल्हापुरात कन्नडच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. सेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांचा एक व्हिडीओ समोर आला असून यात त्यांनी व्यावसायिकांना दम दिला आहे. यापुढे कोल्हापूर जिल्ह्यात एकही कन्नडचा बोर्ड दिसला तर त्यावर शिवसेना स्टाईल कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.