कर्नाटकात CAAच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीवर पोलिसांचा ‘लाठीचार्ज’

कोलार : वृत्तसंस्था – देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ आणि निषेधार्थ रॅली निघताना दिसत आहेत. विरोधात झालेल्या रॅलीत आतापर्यंत कोणतीही हिंसा झाल्याची माहिती समोर आली नाही. परंतु सीएएच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत पहिल्यांदाच मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकच्या कोलारमधील ही घटना आहे. कोलारमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. परंतु येथील स्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं पोलिसांना रॅलीत सहभागी लोकांवर लाठीचार्ज करावा लागला आहे. पोलिसांनी लाठीचार्ज का केला याबाबत खुलासाही केला आहे.

ही रॅली भारतीय नागरिकता रक्षण वेदिका या बॅनरखाली काढण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅलीत सहभागी लोक जिथे जाण्याची त्यांना परवागनी नव्हती अशा ठिकाणी ते गेल्यानं त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनुसार, रॅलीतील लोकांना एमजी रोडपर्यंत जाण्याची परवानगी होती. परंतु ते त्याच्यापुढे गेले. जेव्हा त्यांनी बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी लाठीचार्ज केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/