×
Homeशहरकोल्हापूरमहाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं

महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला चाललेले होते. परंतु त्यावेळी त्यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावरच रोखले. यामुळे कोगनोळी टोल नाक्यावर सकाळच्या वेळेस बराच गोंधळ झाला. गेल्यावर्षी मंत्री यड्रावकर हे एसटीने बेळगावला पोहोचले होते. यामुळे यंदा त्यांना कोणत्याही परिस्थितीत बेळगावला पोहोचू द्यायचे नाही म्हणून कर्नाटक पोलिसांचा फौजफाटा कोगनोळी नाक्यावर लावला होता. सकाळच्या वेळेस प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करून पुढे सोडण्यात येत होते. कोगनोळी टोलनाक्यावर मंत्री यड्रावकर पोहोचताच त्यांना तेथेच पोलिसांनी रोखले. यावेळी पोलीस आणि यड्रावकर कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाल्याने गोंधळ निर्माण झाला.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा दिल्या. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा मंत्री यड्रावकर यांनी निषेध केला. तसेच त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मराठी भाषिकांच्या शिष्टमंडळाला भेट नाकारल्याबद्दल यड्रावकर नाराजीही व्यक्त केली आहे.

Must Read
Related News