कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचं सरकार ‘कोसळणार’ ! काँग्रेसच्या आणखी २ आमदारांचा ‘राजीनामा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील राजकीय नाट्य थांबण्यास तयार नाही, काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या बंडखोर आमदारांनी राजीनामा दिला आहे आणि ते महाराष्ट्रातील विविध भागात थांबले आहेत. बुधवारी कर्नाटक सरकारचे मंत्री डी. के. शिवकुमार हे बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी मुंबईतील रेनिसन्स हॉटेल वर पोहचले परंतू आमदारांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. आता काँग्रेसच्या आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस आमदार सुधाकर आणि एमटीबी नागराज यांनी आपला राजीनामा सभापतींकडे सोपवला आहे.

या नाट्यानंतर आता कुमारस्वामी सरकारमधील राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या आता १६ झाली आहे. यात ३ आमदार जेडीएसचे आहेत तर १३ आमदार काँग्रेसचे आहेत. आता राजीनामा देणारे आमदार देखील मुंबईत येणार असल्याची शक्यता आहे.

मुंबईत पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार आणि मिलिंद देवरा तसेच इतर नेत्यांना कलीना युनिवर्सिटीच्या रेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे. हे नेते जेव्हा मुंबईच्या रेनसान्स हॉटेल बाहेर काँग्रेसच्या आमदारांना भेटण्याच्या प्रयत्नात होते तेव्हा त्यांना पोलीसांना ताब्यात घेतले.

बंडखोर आमदारांच्या याचिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसचे नेते आभिषेक मनु सिंघवी लढणार आहेत. बंडखोर आमदारांनी राजीनामा मंजूर केला जात नाही म्हणून याचिका दाखल केली आहे. यावर गुरुवारी सुनवणी होणार आहे.

येदियुरप्पा यांनी घेतली राज्यपालांची भेट –
राज्यपालांना भेटल्यानंतर भाजपच्या बीएस येदियुरप्पा यांनी सांगितले की, त्यांनी राज्यपालांना सांगितले आहेत की १५ आमदार राजीनामा दिला आहे. आता विधानसभेत काँग्रेस जेडीएसच्या सदस्यांची संख्या १०३ पर्यंत पोहचली आहे. आणि भाजपची १०७ – १०८ आहे. त्यांनी राज्यपालांना विनंती केली आहे की त्यांनी यासंबंधी सभापतींशी चर्चा करावी. कुमार स्वामी यांना मुख्यमंत्री बनून राहण्याचा आधिकार नाही.

आरोग्यविषयक वृत्त

‘ही’ फळे दुधासोबत खाणे आरोग्याला नुकसानकारक

चुकीच्या वेळी ‘नारळ पाणी’ पिणे आरोग्यास ‘घातक’ ; जाणून घ्या

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सावधान ! तांब्याच्या भांड्यात ठेवलेले ‘हे’ पदार्थ बनतात विषारी

माश्या, चिलटांना घरापासून दूर ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स