काँग्रेसने आम्हाला थर्ड क्लासची वागणूक देऊ नये -कुमार स्वामी  

बंगळुरू : कर्नाटक वृत्तसंस्था – भाजपने जनता दल आणि काँग्रेस आघाडीच्या मागे सरकार पाडण्याची ससे हेलपट लावलेली असताना कुमार स्वामी यांनी केलेले विधान हे आता आघाडीत सर्व काही बरे चालले नाही असे दिसते आहे. थर्ड क्लास नागरिकांसारखी आम्हाला वागणूक देऊ नका असे खुद्द कुमार स्वामी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना म्हणले आहे. लोकसभेच्या जागावाटपा वरून सध्या काँग्रेस आणि जनता दल यांच्यात गरमा गरमी सुरु आहे. भाजपच्या विरोधात एकजुटीने लढायचे असल्यात आपल्यातील मतभेद आपण मिटवले पाहिजेत असे कुमार स्वामी यांनी म्हणले आहे.

काँग्रेसने आम्हाला सन्मानाची वर्तणूक दिली पाहिजे. काँग्रेसने आमच्या सोबत तृतीय नागरिका प्रमाणे व्यवहार करू नये. वाटाघाटी करून आपल्यातील मतभेद दूर करून आपण देवाण घेवाणीचे धोरण स्वीकारले पाहिजे असे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी म्हणले आहे. कर्नाटकातील जागा वाटपावरून सध्या दोन्ही पक्षात शीतयुद्ध सुरु आहे. कर्नाटकातील २८ लोकसभेच्या जागांपैकी १२ जागा आमच्या पक्षाला द्यावा अशी मागणी जनता दलाने केली आहे. तर काँग्रेसने या मागणीला अवास्तविक असल्याचे म्हणले आहे.  तर २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने १७ जागी ,काँग्रेसने ९ जागी, तर जनता दलाने दोन जागी विजय मिळवला आहे. अशी सर्व परिस्थिती असताना १२ जागा मागणे व्यवहारी आहे असे काँग्रेसचे मत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि जनता दल आघाडीचे घोडे आघाडीत नाहणार का असे सर्वत्र विचारले जात आहे तर भाजप त्यांच्या भांडणाचा फायदा घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.  तूर्तास भाजपने १६ तारखेला काँग्रेस-जनता दल आघाडीला निर्वाणीचा इशारा दिला आहे.म्हणून १६ जानेवारीचा दिवस कर्नाटकाच्या राजकारणात काय घेऊन येतो हे बघण्यासारखे राहणार आहे.