कर्नाटक सरकार बेळगावला देणार दुसऱ्या राजधानीचा दर्जा

बेंगळुरू: वृत्तसंस्था

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या बाबतीत एका महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव शहराला राज्याच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा कर्नाटक सरकारचा विचार आहे. तसेच काही सरकारी कार्यालये त्याचठिकाणी हलवण्याचे आश्वासन कुमारस्वामी यांनी दिले आहे.

२००६ मध्ये बेळगाव शहराला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव कर्नाटक विधानसभेत एकमताने स्वीकारण्यात आला होती. आता या प्रस्तावाचा विचार करीत कुमारस्वामी सरकारने बेळगाव ला दुसऱ्या राजधानीचा दरजा देण्याचा विचार सुरु केला आहे. “२००६ मध्ये मुख्यमंत्री होतो तेव्हापासून बेळगावला कर्नाटकच्या दुसऱ्या राजधानीचा दर्ज देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यानंतर या प्रस्तावाकडे कोणत्याच सरकारने लक्ष दिले नाही . पण आता मी या प्रस्तावावर पुनर्विचार करणार आहे,’ असे कुमारस्वामी म्हणाले.
[amazon_link asins=’B07FNT85T6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’03063674-956e-11e8-8670-c19b714918ff’]

लवकरच काही सरकारी कार्यालये बेळगावस्थित सचिवालयात हलवण्याचा विचार करत आहे. सध्या तिथे वर्षातून केवळ दहा दिवसच कामकाज चालते . लहान-मोठ्या समस्या आणि कामांसाठी स्थानिकांना बेंगळुरूत यावे लागते . त्यांचा तो त्रास कमी करण्यासाठी वर्षाचे ३६५ दिवस तेथे कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे, असंही कुमारस्वामी म्हणाले.