कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यांतून येणार्‍या प्रवाशांना ‘नो-एन्ट्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : देशातील कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सीएम बीएस येडियुरप्पा यांनी पाच राज्यांतून येणार्‍या विमानांवर बंदी घातली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश , राजस्थान येथून उड्डाणे, रेल्वे आणि गाड्यांच्या येण्यावर तूर्तास बंदी घातली आहे.

दरम्यान, कर्नाटकमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 75 नवीन प्रकरणे नोंदविली गेली आहेत, ज्यानंतर राज्यात संक्रमित लोकांची संख्या 2,493 झाली आहे. आरोग्य विभागाने गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली. दुपारी विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले की, या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत 47 लोकांचा मृत्यू झाला आहे, उपचारानंतर 809 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.

राज्यात सध्या कोरोनामुळे ग्रस्त 1,635 लोकांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी उपचारानंतर 28 निरोगी रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. नवीन संक्रमित 75 रुग्णांपैकी 46 शेजारील महाराष्ट्रातून आले आहेत. याशिवाय तमिळनाडूहून सहा जण, तेलंगणामधून दोन आणि केरळ तसेच दिल्लीहून प्रत्येकी एक- एक परत आला आहे. एका व्यक्तीने संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रवास केला आहे. उडुपीतून राज्यात सर्वाधिक 27 नवीन घटनांची नोंद केली आहे. यानंतर, हसन येथून 13, बेंगलुरू शहर यादवगिरीतून सात- सात, चित्रदुर्ग दक्षिण कन्नडमधून सहा- सहा, कलबुर्गी, चिकमंगलुरूमधून तीन – तीन आणि रायचूरमधील एक प्रकरण उघडकीस आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like