वडिलांनी तर ‘वेल्लूर’ पर्यंत पण नाही फिरवले ; आईने असे म्हटल्यावर मुलाने असे काही केले कि…

भागलपुर : वृत्तसंस्था – अनेक मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत तर एकीकडे काही मुले आपल्या आईवडिलांना वृद्धश्रमात ठेवत असतात, मात्र कर्नाटक मधील एका मुलाने आपल्या कृत्याने सर्वांना त्याचा आदर्श घेण्यास भाग पाडले आहे. त्याने आपल्या वृद्ध आईला भारत दर्शन घडवण्यासाठी त्याने आपला कॉरपोरेट टीम लीडरची नोकरी सोडली. कर्नाटकमधील म्हैसूरचा रहिवासी असलेला ४० वर्षीय डी. कृष्णा आपल्या ६७ वर्षीय आईला घेऊन आपल्या वडिलांच्या स्कुटरवर भारत दर्शन घडवत आहे.

एक दिवस तो त्याच्या आईला मोठ्या देवाच्या मंदिरात घेऊन जाण्यासाठी निघाला असता त्याची आई म्हणाली कि, मी अजून वेल्लूरच्या मंदिरात नाही गेलेली तर मोठ्या मंदिरात काय जाणार, तुझ्या वडिलांनी मला कधी वेल्लूरच्या बाहेर नेले नाही. त्यावर तो म्हणाला की, वडिलांनी जरी तुला फिरवले नसेल तरी मी तुला संपूर्ण भारत भ्रमण करून आणेल. आणि त्याप्रमाणे त्याने त्याचा शब्द पाळत आपली नोकरीचा राजीनामा देत आपल्या आईला संपूर्ण भारत दाखवण्यासाठी निघाला.

आतापर्यंत केला आहे इतका प्रवास

या प्रवासासंबंधी त्याला विचारले असता त्याने सांगितले कि, आईला वडिलांची कमी जाणवु नये, यामुळे जुन्या स्कुटरवरून प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. सांसारिक गोष्टींमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळेच मी लग्न केले नाही. १० सदस्य असलेल्या आपल्या घरात वडिलांना किती कसरत करावी लागत होती हे मी पहिले असल्याने मी हा निर्णय घेतल्याचे त्याने यावेळी सांगितले. तसेच आतापर्यंत त्याने आपल्या या स्कुटरवरून ३८ हजार ४७५ किलोमीटरचा प्रवास केला आहे.