कर्नाटकचे ‘बंडखोर’ आमदार प्रचंड पोलिस बंदोबस्तात शिर्डीत साईदरबारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील बंडखोर आमदार श्री साईबाबांच्या दर्शनासाठी साईदरबारी दाखल झाले आहेेेेत. सर्व बंडखोर आमदार दाखल होताच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाा आहे.

जनता दल (एस) व काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत त्यांना अपात्र ठरवण्यासंबंधी मंगळवारपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांना दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला चार दिवसांचा दिलासा मिळाला आहे. कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी दाखवून विरोधकांना चकित केले आहे. बंडखोर आमदारांपैकी दहा आमदारांच्या विधानसभा अध्यक्षांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी एकत्रित सुनावणी झाली. त्यानंतर बंडखोर आमदार मुंबईहून आज शिर्डीमध्ये साई दर्शनाला दाखल झाले.

सत्तेचा पेच मिटावा, यासाठी त्यांनी आज साई दर्शन घेतले. यावेळी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता. शिर्डीचे साईबाबा या बंडखोर आमदारांना पाहणार की मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना आशीर्वाद देणार, हे आता पाहावे लागणार आहे.

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’