90 च्या दशकातील ‘शाळकरी’ विद्यार्थ्याच्या ‘लूक’साठी कार्तिक आर्यननं घटवलं तब्बल 8 KG वजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा लव आजकल हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दोन वेगळ्या काळातील दोन वेगळ्या लव स्टोरीज पाहायला मिळणार आहे. कार्तिक विद्यार्थ्याच्या भूमिकेतही दिसणार आहे. तुम्हाला माहिती आहे का या सिनेमासाठी कार्तिकनं तब्बल 8 किलो वजन कमी केलं आहे. भूमिकेसाठी त्यानं प्रचंड मेहनत घेतली आहे.

कार्तिक एक भूमिका 90 च्या काळातील साकारणार आहेत तर दुसरी भूमिका तो आजच्या जमान्यातील व्यक्तीची साकारणार आहे. रघु आणि वीर अशी त्याच्या दोन भूमिकांची नावे आहेत. रघु 90 च्या काळातील आहे. रघु हा एक शाळेतील मुलगा आहे. या भूमिकेत परफेक्ट बसण्यासाठी त्यानं 8 किलो वजन घटवलं आणि हेअर स्टाईलही बदलली होती. रघुच्या भूमिकेतील वाटण्यासाठी त्याला स्ट्रीक्ट डाएट फॉलो करावा लागला आहे.

कार्तिकनं नुकताच एक सेटवरील फोटो शेअर केला आहे. ज्यात तो शालेय विद्यार्थ्यासारखा दिसत आहे. यात त्याचे सहकलाकारही दिसत आहेत. कार्तिक अगदी विद्यार्थीच दिसत आहे. नुकताच सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चाहत्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

इम्तियाज अलीनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा व्हॅलेंटईन्स डेच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. 31 जुलै 2009 रोजी लव आज कलचा पहिला पार्ट रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर सिनेमाचा दुसरा पार्ट रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका आणि सैफ अली खान सोबत दिसले होते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !