कार्तिक-साराचा किसिंगचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल 

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड मध्ये अनेक कपल प्रमाणे ज्यांच्या नावाची चर्चा होते ते म्हणजे सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या नावाची. सध्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. याच कारण म्हणजे कार्तिक-सारा एकमेकांना किस करताना या व्हिडीओत दिसत आहे.

साराने काही दिवसांपूर्वीच ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचं सांगितले होतं. यानंतर कार्तिकनेही साराला डेट करण्याची तयारी दर्शवली होती. यानंतर त्याच्या अफेअर च्या चर्चांना उधाण आले.

https://twitter.com/KartikAaryanFC_/status/1102949710556528642?

हा किसिंग सीनचा  व्हिडिओ ‘लव्ह आज कल २’च्या सेटवरचा आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित हा चित्रपट दीपिका पदुकोण आणि सैफ अली खानच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचा सिक्वल असल्याचं म्हटलं जात आहे. २००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता.

‘जब वी मेट’, ‘लव्ह आज कल’, ‘तमाशा’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन  इम्तियाजने केलं होत. या चित्रपटात सारा आणि कार्तिकसोबतच अभिनेता रणदीप हुडासुद्धा भूमिका साकारत आहे. पंजाब आणि दिल्लीत याची शूटिंग पार पडणार आहे.