‘पती,पत्नी और वो’ रिमेकची अधिकृत घोषणा, कार्तिकसोबत दिसणार ‘या’ अभिनेत्री 

मुंबई : वृत्तसंस्था- ऐंशीच्या दशकातील  संजीवकुमार स्टारर हिट चित्रपट ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची आतापर्यंत नुसती चर्चा होती परंतु आता याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.  या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे तर भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे या दोघी त्याच्या सोबत दिसून येणार आहे.

टी-सिरिझ आणि बीआर स्टुडिओ अंतर्गत या चित्रपटाची निर्मीती करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या रिमेकचेही नाव ‘पती पत्नी और वो’, हेच राहणार असून. कथेत फक्त काही प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात कार्तिक पहिल्यांदाच अनन्या पांडे आणि भूमीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता.त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या हेतूने मुदस्सर अजीज यांनी रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे. मुदस्सर अजीज ‘पती,पत्नी और वो’ च्या रिमेकचं दिग्दर्शन करणार आहेत.

या चित्रपटात पहिल्यांदा तापसी पन्नूला घेतले होते पण काही दिवसापूर्वीच तिला काढून तिच्या जागी या चित्रपटात अनन्या पांडे हिला स्थान देण्यात आले आहे.  यावर तापसीने संताप व्यक्त केला होता.

You might also like