Kartik Aaryan | कार्तिक आर्यनला पाहताच चाहती ढसा ढसा रडली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Kartik Aaryan | नविन चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बॉलीवूडचे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी फिरताना दिसत असतात. त्याचबरोबर ते अनेक शो आणि कार्यक्रमांमध्ये देखील दिसत असतात. आता अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) त्याच्या आगामी चित्रपट शहजादाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कार्तिकचे फॅन फॉलोवर्स देखील मोठ्या प्रमाणात आहेत. कार्तिक सध्या कोलकत्ता येथे चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. यावेळी तो त्याच्या चाहत्यांना भेटत त्यांच्यासोबत सेल्फी देखील काढत होता. या वेळेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

कार्तिकने अल्पावधीतच त्याच्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. कार्तिकची एक झलक पाहण्यासाठी चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कोलकत्ता मध्ये शहजादा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिक गेला असता चाहत्यांनी आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्तिकची एक चाहती त्याला पाहताच भावुक झाल्याचे देखील पाहायला मिळाले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्तिकला भेटल्यावर एका चाहतीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आणि कार्तिकने (Kartik Aaryan) तिच्यासोबत सेल्फी काढताच तीने त्याला मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली. त्यावेळी कार्तिकचे अनेक चाहते देखील तेथे उपस्थित होते. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. कार्तिकचा शहजादा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

शहजादा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाची तिकीट विक्री सुरू आहे.
चित्रपटाच्या तिकीट विक्रीवरून हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच 8 कोटींची कमाई करेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
हा चित्रपट अल्लू अर्जुन याची मुख्य भूमिका असलेला ‘अला वैकुंठपुरमलो’ याचा रिमेक आहे.
या चित्रपटात कार्तिक आर्यन सोबत क्रिती सनॉन, राजपाल यादव हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवन यांनी केले आहे.

Web Title :- Kartik Aaryan | fan gets emotional after seeing favourite star kartik aryan during promotion of shehjada

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dr. Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची उलटतपासणी

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : हेमंत रासनेंच्या मागे ‘सत्तेची ताकद’ तर रविंद्र धांगेकरांना जनतेचा ‘आशीर्वाद’?

Madhuri Pawar | रानबाजारनंतर माधुरी दिसणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; साकारणार भावूक करणारी भूमिका