×
Homeताज्या बातम्याKartik Aaryan | कार्तिक आर्यनने वाढदिवशी शेअर केली 'हि' खास पोस्ट; पोस्ट...

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनने वाढदिवशी शेअर केली ‘हि’ खास पोस्ट; पोस्ट व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अनेक सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन (Kartik Aaryan). कार्तिक ने त्याच्या अभिनयाच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहचला आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कार्तिक नेहमी सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांबरोबर नेहमीच पोस्ट शेअर करत असतो. आज कार्तिकचा 32 वा वाढदिवस तो साजरा करत आहे. या संदर्भात त्याने एक पोस्ट इंस्टाग्राम वर शेअर केली आहे. (Kartik Aaryan)

 

कार्तिकने (Kartik Aaryan) त्याचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला आहे. त्यांनी इंस्टाग्राम वर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये तो कुटुंबीयांसोबत दिसत आहे. तर या फोटोज मध्ये त्याचे आई वडील आणि त्याचा पाळीव कुत्रा कटोरी ही दिसत आहे. फोटोच्या मागे ‘लव्ह यू कोकी’ असे लिहिलेले देखील दिसत आहे. फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये कार्तिकने म्हटले की, “प्रत्येक जन्मात मला तुमचा कोकी म्हणून जन्म घ्यायचा आहे. वाढदिवसाच्या गोड सरप्राईज बद्दल आई-बाबा कटोरी किकी धन्यवाद”. कार्तिकच्या या पोस्टवर सध्या अनेक कमेंट्स आणि लाईक येत आहेत. तर सर्वत्र कार्तिकवर शुभेच्छांचा वर्षाव देखील होत आहे.

 

कार्तिकच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ‘भूल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या नंतर तो कियारा (Kiara Advani) सोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘सत्य प्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हा चित्रपट 29 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कार्तिक ‘आशिकी 3’ (Aashiqui 3),
‘शहजादा’ (Shehzada), ‘फ्रेडी’ (FRiENDi) आणि ‘कॅप्टन इंडिया’ (Captain India) हे चित्रपट देखील करत आहे.
कार्तिकने आजपर्यंत ‘प्यार का पंचनामा’ (Pyaar Ka Punchnama), ‘प्यार का पंचनामा 2’ (Pyaar Ka Punchnama – 2),
‘सोनू के टीटू की स्वीटी’ (Sonu Ke Titu Ki Sweety), ‘लुका छुपी’ (Luka Chuppi), ‘पति पत्नी और वो’ (Pati Patni Aur Woh),
‘धमाका’ (Dhamaka) आणि ‘लव्ह आज कल’ (Love Aaj Kal) सारखे सुपर हिट चित्रपट दिले आहेत.

 

Web Title :- Kartik Aaryan | kartik aaryan expressed wish on his birthday share photo

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nora Fatehi | नोरा फतेहीबरोबर सहकलाकाराने केलं गैरवर्तन अन् दोघांमध्येही सेटवरच झाले भांडण; अभिनेत्रीनं सांगितलेला ‘तो’ किस्सा चर्चेत

Sanjay Raut | शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणारे सीमाप्रश्नाला काय न्याय देणार?

Pune Crime | सावत्र बापाने केले 15 वर्षाच्या मुलीला गर्भवती; नराधम बापाला अटक, वानवडी पोलीस ठाण्यात FIR

Must Read
Related News