Kartik Aaryan | कार्तिक आर्यनला लाईव्ह कार्यक्रमादरम्यान झाली दुखापत; तब्बल अर्ध्या तासांनी मिळाली वैद्यकीय मदत

पोलीसनामा ऑनलाइन : बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा सध्या खूपच चर्चेत आहे. कार्तिकचे चाहते देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. कार्तिकने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. कार्तिक (Kartik Aaryan) प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत चाहत्यांना भेटत असतो. अशाच एका कार्यक्रमात चाहत्यांना भेटत असताना त्याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

कार्तिकच्या लाईव्ह कार्यक्रमाला चाहते आवर्जून हजेरी लावत असतात. कार्तिक देखील कार्यक्रमादरम्यान चाहत्यांची इच्छा नेहमी पूर्ण करत असतो. एका कार्यक्रमात कार्तिक (Kartik Aaryan) त्याच्याच भूल भुलैया 2’ चित्रपटातील हुकस्टेप करताना त्याच्या पायाला दुखापत झाली. या गाण्याची हुकस्टेप करताना त्याच्या पायाचा घोटा मुरगळला त्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली. यावेळी बराच वेळ त्याने त्याचा पाय स्टेजवर टेकवला ही नाही. आधी कार्तिक गंमत करत असल्याचे चाहत्यांना वाटले. मात्र जेव्हा त्यांना संपूर्ण घटना समजली तेव्हा ते त्याची काळजी करू लागले.

यावेळी कार्तिकने लगेच स्टेजवरून एक्झिट नाही घेतली. वैद्यकीय मदत येईपर्यंत तो स्टेजवरच थांबून राहिला.
जवळपास अर्धा तासांनी वैद्यकीय पथक आणि तपासणी केल्यानंतर त्याला प्राथमिक उपचार दिले
त्यानंतर डॉक्टरांच्या मदतीने कार्तिकला त्याचा पाय खाली टेकवण्यात यश आले.

Web Title :- Kartik Aaryan | kartik aaryan gets injured during dancing in live show

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde – Gopinath Munde | लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरा पगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MP Sanjay Raut | देवेंद्रजी, गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का?, संजय राऊतांनी बार्शीमधील ‘त्या’ पीडित मुलीचा फोटो केला शेअर

Pune ACB Trap | पोलिस निरीक्षकाकरिता 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा निघाला आमदाराचा चुलत भाऊ, युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’