Kartik Aaryan | करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ मधून बाहेर पडण्यामागील कारण कार्तिक आर्यानने केले स्पष्ट ; म्हणाला …

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kartik Aaryan | सध्या बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकचा ‘भुलभुलय्या 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. यंदाच्या वर्षात अनेक सुपरस्टार कलाकारांचे चित्रपट फ्लॉप होत असतानाच कार्तिकच्या या चित्रपटाने मात्र एक नवा विक्रम गाठला आहे. आता पुन्हा एकदा कार्तिक त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या ‘आला वैकुंठपुरमलो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘शेहजादा’ या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये कार्तिक व्यस्त आहे. (Kartik Aaryan)

 

शेहजादा चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कार्तिकने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने पहिल्यांदाच करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’ या चित्रपटांमधून बाहेर पडण्याबाबत भाष्य केले आहे. यावेळी बोलताना कार्तिक म्हणाला की, “मला माझ्या घरच्यांनी एक चांगली शिकवण दिली आहे. ती म्हणजे जर एका लहान आणि मोठ्या व्यक्तीत बेबनाव असेल तर लहान व्यक्तीने त्याबद्दल कुठेही वाच्यता करू नये. हे माझ्या घरचे संस्कार आहेत. यामुळे मी यावर काही भाष्य करणार नाही. मात्र तेव्हा कोविड सुरू होता आणि चित्रपटात अनेक बदल घडत होते त्यामुळे मी यातून बाहेर पडलो. बाकी मी पैशांसाठी यातून बाहेर पडलो वगैरे वगैरे या सगळ्या कान गोष्टी आहेत. हो मी लालची आहे पण मी लालची पैशांसाठी नाही तर स्क्रिप्ट साठी आहे”. (Kartik Aaryan)

कार्तिकने दोस्ताना 2 मधून बाहेर पडताच त्याने जास्त पैसे मागितल्यामुळे तो बाहेर पडल्याचे बोलले जात होते. आता अखेर कार्तिकने यावर मौन सोडत स्पष्टीकरण दिले आहे. तर दुसरीकडे शेहजादाचा ट्रेलर फारच चर्चेत आहे. या ट्रेलरला खुद्द करणने देखील लाईक करत कार्तिकची प्रशंसा केली होती. या चित्रपटात कार्तिक बरोबर क्रीती सनॉन, परेश रावल, मनीषा कोइराला हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Web Title :- Kartik Aaryan | kartik aaryan spoke first time about karan johar dostana 2 controversy on aap ki adalat

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shreyas Talpade | ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या दुसऱ्या भागाविषयी श्रेयस तळपदेने दिली ‘हि’ मोठी हिंट; पोस्ट वायरल

Mrunal Thakur | अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या एथनिक लूकने चाहते घायाळ; फोटोवर होतोय कमेंटचा वर्षाव

Gandhi Godse-Ek Yudh | ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी अभिनेत्री रेखाने वेधले सर्वांचे लक्ष; फोटो वायरल