×
Homeताज्या बातम्याKartik Aaryan | कार्तिकने ‘दृश्यम 2’ आणि ‘भूल भुलैय्या 2’ यांच्यातील कनेक्शनबाबत...

Kartik Aaryan | कार्तिकने ‘दृश्यम 2’ आणि ‘भूल भुलैय्या 2’ यांच्यातील कनेक्शनबाबत केला मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Kartik Aaryan | ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि या चित्रपटांनी नवे विक्रम देखील बनवायला सुरुवात केली. यामध्ये बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगन (Ajay Devgn) च्या अभिनयाचे चाहते कौतुक करत आहेत. तर चित्रपटातील कथेने सर्वांनाच भुरळ घातली आहे. एवढेच नाही तर प्रेक्षकांसोबत अनेक कलाकार ही या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. अशातच आघाडीचा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्याने (Kartik Aaryan) या चित्रपटासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे कार्तिकने ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) आणि ‘भूल भुलैय्या 2’ (Bhool Bhulaiyaa 2) यांच्यातले कनेक्शन या पोस्ट मधून शेअर केले आहे.

 

कार्तिक (Kartik Aaryan) ने पोस्टमध्ये त्याचा आणि अजय देवगन (Ajay Devgn) चा फोटो शेअर केला आणि त्याला सुंदर असे कॅप्शन देखील दिले आहे. सध्या या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या कार्तिक आर्यन आणि अजय देवगन गोव्यामध्ये (Goa) इफ्फी’साठी आले आहेत. यावेळी काढण्यात आलेला फोटोज कार्तिकने शेअर केला आहे.

 

फोटो शेअर करत कार्तिकने (Kartik Aaryan) कॅप्शनमध्ये म्हटले की, “विजय साळगावकर आणि रूह बाबा यांनी 2 ऑक्टोबरला गोव्यात एकत्र पावभाजी खाल्ली आणि तीन ऑक्टोबरला सत्संग करून ते मुंबईत आले. पावभाजी खूप छान होती”. कार्तिकची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तर यावर अनेक कमेंट देखील येत आहेत. काही चाहत्यांनी रूह बाबा आणि विजय साळगावकर यांना एकत्र बघायला आवडेल अशी कमेंट केली आहे.

दरम्यान दृश्यम चित्रपटाच्या या सिक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते.
2014 मध्ये दृश्यम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
त्यानंतर त्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते.
आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही यशस्वी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
या चित्रपटातील सर्व कलाकारांचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.

 

Web Title :- Kartik Aaryan | kartik aryan wrote a special post for ajay devgan and drishyam 2

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nora Fatehi | नोरा फतेहीबरोबर सहकलाकाराने केलं गैरवर्तन अन् दोघांमध्येही सेटवरच झाले भांडण; अभिनेत्रीनं सांगितलेला ‘तो’ किस्सा चर्चेत

Sanjay Raut | शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणारे सीमाप्रश्नाला काय न्याय देणार?

Pune Crime | सावत्र बापाने केले 15 वर्षाच्या मुलीला गर्भवती; नराधम बापाला अटक, वानवडी पोलीस ठाण्यात FIR

Must Read
Related News