कार्तिक आर्यननं शेअर केला ‘सारा’ला घास भरवतानाचा फोटो, अ‍ॅक्टर म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांची ऑफ स्क्रिन केमिस्ट्री कोणापासूनच लपून राहिलेली नाही. लवकरच दोघे ऑनस्क्रीन रोमँस करताना दिसणार आहे. लव आज कल 2 या सिनेमातील कार्तिक आणि साराची बाँडिंग सर्वांनाच आवडली आहे. कार्तिक आर्यननं नुकताच एक शुटींगदरम्यानचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघंही एकाच ताटात जेवताना दिसत आहेत.

कार्तिक आणि सारा एकमेकांच्या खूपच जवळ आहेत. कार्तिक आणि साराची जोडी चाहत्यांनाही खूप आवडली आहे. नुकताच कार्तिकनं सारासोबत लव आजकल 2 या सिनेमाच्या शुटींगजदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोत दिसत आहे की, दोघं एकत्र बसून जेवण करत आहेत आणि कार्तिक साराला आपल्या हातानं घास भरवत आहे. कार्तिकनं हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “खूपच बारीक झाली आहेस. चल पहिल्यासारखी तब्येत करूयात.”

इम्तियाज अलीनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा व्हॅलेंटईन्स डेच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. 31 जुलै 2009 रोजी लव आज कलचा पहिला पार्ट रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर सिनेमाचा दुसरा पार्ट रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका आणि सैफ अली खान सोबत दिसले होते.