सारानंतर ‘जवानी जानेमन’च्या अलायाचा ‘क्रश’ झाल्यामुळं स्वतः कार्तिक आर्यन ‘खुश’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यनची आज इंडस्ट्रीत वेगळी ओळख आहे. यंग जनरेशनही त्याच्या प्रेमात आहे. बॉलिवूडधीलही काही अभिनेत्रींचंही त्याच्यावर क्रश आहे. सैफ अली खानची लाडकी साराचंही त्याच्यावर क्रश आहे. काही दिवसांपूर्वी सैफची ऑनस्क्रीन मुलगी अलाया फर्निचरवालाचंही त्याच्यावर क्रश असल्याचं तिनं सांगितलं होतं. कार्तिकसोबत बेड शेअर करायला मला काही अडचण नाही असं अलाया म्हणाली होती. यावर आता कार्तिकची रिअ‍ॅक्शन आली आहे.

अलायाचा क्रश असल्याचा कार्तिकला आनंद

कार्तिक आर्यनला लव आज कल 2च्या प्रमोशनमधील एका मुलाखतीत अलायाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. अलायाच्या बेड शेअर करण्याच्या आणि क्रशच्या विधानावर प्रतिक्रिया देताना कार्तिक म्हणला, “मला माझ्याकडे मिळणारं अटेंशन आवडतं. यामुळे मला चांगलं वाटतं. मी नक्कीच काहीतरी चांगलं करत आहे. आपली स्तुती ऐकून कधीच वाईट वाटायला नाही पाहिजे. होय. मी खुश आहे. मला स्तुती मिळत आहे. मी यावर काही प्रतिक्रिया जरी नाही दिली तरी मला चांगलं वाटतं आहे.” असं त्यानं सांगितलं.

काय म्हणाली होती अलाया ?

एका चॅट शोमध्ये बोलताना अलायाला विचारण्यात आलं की, अचानक जर बेडवर कार्तिक आर्यन दिसला तर काय करशील? यावर अलाया म्हणाली, “कार्तिक आर्यनसोबत बेड शेअर करायला मला काहीच आश्चर्य वाटणार नाही.”

https://www.instagram.com/p/B8fTMY0jBNZ/

सारा, अलायाव्यतिरीक्त अनन्याचंही कार्तिकवर क्रश

यापूर्वी सारानं कार्तिकवर क्रश असल्याचं म्हटलं होतं. तिनं सांगितलं होतं की, तिला कार्तिकला डेट करायचं आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेनंही कार्तिकवर क्रश असल्याचं मान्य केलं होतं. जान्हवी कपूरनंही कार्तिकचं कौतुक केलं होतं.

https://www.instagram.com/p/B8QMjT1pd-j/

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कार्तिकचा लव आज कल 2 हा सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात सारा अली खान आणि आरुषी शर्मा या त्याच्या हिरोईन्स आहेत.