”कार्तिक आर्यन-अजय देवगण’च्या बड्या सिनेमांचे सीक्वल फायनल, जाणून घ्या कधी होणार ‘धमाका’

पोलिसनामा ऑनलाइन –लॉकडाऊनमध्ये सिनेमाप्रेमींसाठी आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, अभिनेता अजय देवगण आण कार्तिक आर्यन यांच्या बड्या सिनेमांचे सीक्वल फानयल झाले आहेत. फिल्ममेकर भूषण कुमार यांनी यावर शिक्कामोर्तबही केलं आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, असं सांगितलं जात आहे की टी सीरिजचे मालक भूषण कुमार लॉकडाऊन संपल्यानंतर काही मोठे प्रोजेक्ट्स सुरू करण्याचा प्लॅन करत आहेत. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, अजय देवगणचा दे दे प्यार दे आणि कार्तिक आर्यनचा सोनू के टीट्टू की स्वीटी या सिनेमांचे सीक्वल सुरू करणार आहे.

भूषण कुमारकडून सांगण्यात आलं आहे की, लव रंजन आणि माझ्या डोक्यात दे दे प्यार दे चा सीक्वल आहे. आम्ही सोनू के टीट्टू की स्वीटी ला देखील फ्रेंचाईजीमध्ये बदलणार आहोत. या वक्तव्यानंतर आता अजय देवगण आणि कार्तिक आर्यन यांच्या सिनेमांच्या सीक्वलवल तगडं शिक्कामोर्तब झालं आहे. चाहत्यांना आता दे दे प्यार दे आणि सोनू के टीट्टू की स्वीटी यांचे पुढचे भाग पहायला मिळणार आहे. ही बामती समोर आल्यानंतर आता चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.