अभिनेत्री साराच्या समोरच कार्तिकनं सांगितला त्याचा ‘व्हॅलेंटाईन्स’चा ‘डेट नाईट’ प्लॅन (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या लव आज कल या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ट्रेलरला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमादरम्यान बोलताना कार्तिकनं सारा समोरचं त्यांचा व्हॅलेंटाईन्स डेचा प्लॅनही सांगून टाकला. त्यांची डेट नाईट कशी असणार आहे हे त्यानं सांगितलं आहे. सारा आणि कार्तिकचा मजेदार संवाद झाला आहे ज्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

लव आज कल 2 सिनेमामुळे सारा आणि कार्तिक यांची जवळीकता वाढताना दिसली. काही दिवसांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात होतं. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून तसं चित्र मात्र दिसत नाही. सारानं एकदा चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आणि आता चक्क दोघे एकत्र काम करणार आहेत. आता तिची डेट करण्याची इच्छाही पूर्ण होणार आहे. दोघांच्या डेट नाईटचा प्लॅन समोर आला आहे.

ट्रेलिंग लाँचिंग कार्यक्रमात कार्तिकला त्याचा व्हॅलेंटाईन्स प्लॅन विचारण्यात आला तेव्हा कार्तिकाच्या आधी सारानंच उत्तर दिलं. सारा म्हणाली, “आम्ही लव आज कल पाहणार आणखी काय करणार.” त्यांचा सिनेमा 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. कार्तिकला पुन्हा एकदा प्लॅन विचारला. कार्तिक बोलणार एवढ्यात सारा म्हणाली, तो येणार नाही का ? तुम्ही असं का विचारत आहात. नंतर ती कार्तिकला विचारते, नाही येणार का तू ? कार्तिक म्हणतो, आपण दोघं एकत्र जाणार का ? यावर सारा म्हणते आपला सिनेमा आहे. माझ्यासोबत नाही तर कोणासोबत जाणार आहेस. त्यांच्या संवादानंतर सर्वच हसू लागतात.

कार्तिक पुढे म्हणतो, “हो आम्ही दोघंही लव आज कल सिनेमा पाहायला जाणार आहोत. त्या रात्री आणि त्याच्या आदल्या रात्रीदेखील. ही आमची डेट नाईट असेल. याचा व्हिडीओदेखील सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

इम्तियाज अलीनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा व्हॅलेंटईन्स डेच्या दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. 31 जुलै 2009 रोजी लव आज कलचा पहिला पार्ट रिलीज झाला होता. आता 11 वर्षांनंतर सिनेमाचा दुसरा पार्ट रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका आणि सैफ अली खान सोबत दिसले होते. आता सिक्वलमध्ये सैफची मुलगी सारा दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !