Video : चित्रपटाच्या सेटवर ‘ढसा-ढसा’ रडला कार्तिक आर्यन

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा चित्रपट ‘लव आज कल २’ शूटिंग पुर्ण झाली आहेत. ६६ दिवसामध्ये या चित्रपटाची शूटिंग पुर्ण केली आहे. ही शूटिंग पुर्ण होताच हे दोघे निराश दिसत आहे. या दोघांनी सोशल मिडियावर एकमेकांना भावनिक पोस्ट लिहली आहे. या दरम्यान कार्तिकचा एक भावनिक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता कार्तिक आर्यनचा हा व्हिडिओ ‘लव आज कल २’ चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटच्या दिवशीचा आहे. या व्हिडिओमध्ये कार्तिक चित्रपटाचे डायरेक्टर इम्तियाज अलीच्या गळ्यात पडून खूप जोरात रडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते की शूटिंग पुर्ण झाल्यामुळे कार्तिक खूप निराश आहे.

चित्रपटाची शूटिंग पुर्ण झाल्यानंतर कार्तिक आणि साराने एकमेकांना एक भावनिक पोस्ट लिहली आहे. कार्तिकने लिहले की, ‘६६ दिवस पुर्ण झाल्यानंतर असे वाटते की हे क्षण संपू नये. मी माझ्या ड्रिम डायरेक्टरचे आभार मानतो. या पुर्ण प्रवासामध्ये माझ्यासोबत चित्रपटात काम करणारी अभिनेत्री प्रिंसेस सारा अली खानपेक्षा चांगली भूमिका कोणीच साकारु शकत नाही. मी तिच्यासोबत वारंवार काम करण्यास तयार आहे.’

कार्तिकने भावनिक पोस्ट शेअर करण्याआधी साराने ही पोस्ट लिहली होती. साराने कार्तिकबद्दल लिहले की, ‘तुझ्यासोबत काम करुन खूप छान वाटले. काम करताना मला खूप कंफर्टेबल वाटले. तु माझी इतक्या छान प्रकारे काळजी घेतली त्याबद्दल तुझे खूप आभार. आपण पुन्हा भेटूया. मी तुम्हाला खूप मिस करत आहे.’

 

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार