कार्तिक आर्यन ते सुशांत सिंह राजपूत ! ‘या’ 5 अभिनेत्यांसोबत रिलेशनशिपमध्ये होती सारा अली खान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या अनेक बातम्या अद्याप समोर आल्या आहेत. परंतु सारा अली खान हिनं आतापर्यंत बॉलिवूडमधील 5 अभिनेत्यांना डेट केल्याचं बोललं जात आहे. याच अभिनेत्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

1) वीर पहारिया- एक काळ असा होता जेव्हा सारा वीर पहारिया याला डेट करत होती. वीर सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सारा आणि वीर या दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. नंतर सारानं हे फोटो डिलीट केले आहेत.

https://www.instagram.com/p/Bufw9-7hd_v/

https://www.instagram.com/p/BsDfil8BfWL/

https://www.instagram.com/p/BsDe9mJB_0H/

https://www.instagram.com/p/BsDfYPBBrOU/

2) ईशान खट्टर- सारा अली खान ईशान खट्टरसोबतही नात्यात होती. ईशान शाहिद कपूरचा भाऊ आहे. सारा आणि ईशान अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. कॉफी विथ करणमध्ये बोलताना सारानं सांगितलं होतं की, बॉलिवूडमधील दोन भावांपैकी एकाला मी डेट केलं आहे.

3) हर्षवर्धन कपूर- सारा आणि हर्षवर्धन कपूर हे देखील नात्यात होते. हर्षवर्धन सोनम कपूरचा भाऊ आहे. दोघं अनेकदा एकत्र हातात हात घालून फिरताना दिसले आहेत. दोघं एकमेकांना बेबी म्हणून हाक मारायचे असेही बोलले जाते. करीना आणि सैफच्या घरी पार्टीतही दोघं एकत्र दिसले आहेत. या गोष्टीमुळं साराची आई अमृता सिंह देखील एकदा भडकली होती.

4) सुशांत सिंह राजपूत- केदारनाथ सिनेमातून सारानं डेब्यू केला होता. या सिनेमादरम्यान सुशांत आणि सारा एकमेकांना डेट करत होते अशी माहिती आहे. अनेकांनी त्यांना सिक्रेट डिनर करतानाही पाहिले आहे. करीनानं या नात्याबद्दल सल्ला दिल्यानंतर तिनं या नात्याला फुलस्टॉप दिल्याचं बोललं जात आहे.

5) कार्तिक आर्यन- रणवीर सिंगनं कार्तिक आणि साराची ओळख करून दिल्यानंतर दोघं अनेकदा एकत्र दिसले होते. कॉफी विथ करण या शोमध्ये सारानं कार्तिकवर क्रश असल्याचं सांगितलं होतं. लव आज कल 2 या सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं आहे. यावेळी ते जवळ आले असंही सांगितलं जातं.