Kartik Maas 2020 : कार्तिक महिन्यात केली जाते तुळशीची पूजा, पूजेच्या वेळी ‘या’ 6 गोष्टी लक्षात ठेवल्यास होईल धनलाभ, जाणून घ्या

Kartik Maas 2020 : शरद पूर्णिमेनंतर कार्तिक मास सुरू होतो. यावर्षी 31 ऑक्टोबर 2020 ला शरद पोर्णिमेचा समारोप झाला आहे आणि 1 नोव्हेंबर 2020 पासून कार्तिक महिना सुरू झाला आहे. या महिन्यात भगवान विष्णू पाण्यात निवास करतात, यासाठी या महिन्यात सकाळी सूर्यादयाच्या अगोदर स्नान केल्याने खूप जास्त पुण्य आणि धनला होता. यासोबतच कार्तिक महिन्यात तुळशी पूजनाचे विशेष महत्त्व असते. संपूर्ण कार्तिक महिन्यात तुळशी मातेच्या समोर दिवा लावला जातो. यातून मोठे पुण्य आणि धनलाभ होतो. सुख-संपदा आणि मान-सन्मानात वाढ होते.

असे मानले जाते, की कार्तिक महिन्यात चंद्र-तार्‍यांच्या उपस्थितीत सूर्योदयापूर्वी अंघोळ केल्याने पुण्य प्राप्त होते. कार्तिक महिन्यात तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. तुळशी विवाह केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते. घर सुख आणि संपत्तीने भरते. सन्मान आणि वैभवाची प्राप्ती होते. तुळशी विवाहासाठी तुळशी वृंदावन संजवले जाते. उसाने मंडप तयार केला जातो, त्यावर वधूची ओढणी टाकली जाते.

तुळशी पूजनाचे नियम :
1 हे लक्षात ठेवा की, स्नान केल्याशिवाय तुळशीपत्र तोडू नका.
2 कधीही सायंकाळी तुळशीपत्र तोडू नये.
3 पोर्णिमा, अमावस्या, द्वादशी, रविवार व संक्रांतीच्या दिवशी सकाळ, दुपार आणि संध्याकाळी तुळशीपत्र तोडू नका.
4 जेव्हा घरात सूतक असेल तेव्हा तुळशीपत्र तोडू नये. अशा आवस्थेत तुळशीपत्र ग्रहणदेखील करू नये. कारण तुळशी श्री हरीचे स्वरूप आहे.
5 तुळशीपत्र दाताने चावून खाऊ नये.
6 स्नानानंतर तुळशीला नियमित जल अर्पण केले पाहिजे.