Kartiki Ekadashi | औरंगाबादचे दाम्पत्य ठरले महापूजेचे मानकरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची सपत्नीक महापूजा

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त (Kartiki Ekadashi) पंढरपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते पहाटे विठ्ठल रुक्मिणीची महापूजा (Vitthal Rukmini Mahapuja) करण्यात आली. यावेळी औरंगाबादचे वारकरी उत्तमराव साळुंखे (Warkari Uttamrao Salunkhe) आणि कलावती साळुंखे (Warkari Kalavati Salunkhe) यांना महापूजेचा मान मिळाला. (Kartiki Ekadashi)

कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाच्या वारकरी म्हणून दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी हा मान उत्तमराव माधवराव साळुंखे (वय ५८) आणि कलावती उत्तमराव साळुंखे (वय ५५, रा. शिरोडी खुर्द, फुलंबी, जि. औरंगाबाद) यांना मिळाला आहे. हे पतीपत्नी मागील ५० वर्षांपासून विठुरायाची यात्रा करीत आहेत.

कार्तिकी यात्रेनिमित्त (Kartiki Ekadashi) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या
(Shri Vitthal Rukmini Temple Committee) वतीने नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप, विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यात सुंदर व आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली आहे.

याअगोदर महापूजेसाठी मंदिरात येण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस हे
वारकर्‍यांच्या मेळ्यात सहभागी झाले. त्यांनी भजनात सहभागी होत फुगडीचा फेर धरला होता.

Web Title :- Kartiki Ekadashi | A couple from Aurangabad became the champions of Mahapuja; Consort Mahapuja of Panduranga by the Deputy Chief Minister

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Deepika Padukone | आलियाच्या होणाऱ्या बाळासाठी दीपिकाने शेअर केली ‘ती’ पोस्ट, सगळीकडे होत आहे चर्चा

Radhakrishna Vikhe-Patil | बैलगाडा शर्यतींबाबत लम्पी चर्मरोगाच्या स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय- राधाकृष्ण विखे- पाटील