Karuna Munde | ‘ते’ काम बंद करण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार, करुणा धनंजय मुंडे यांची माहिती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि त्यांच्या पत्नी करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी नवा पक्ष (New Party) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आज नगरमध्ये (Ahmednagar) कार्यकर्ता मेळावा आणि पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी बोलताना राज्यात अनेक प्रश्न आता निर्माण झाले असून या प्रलंबित विषयाबाबत लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार असल्याचे करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी सांगितले.

 

‘शिवशक्ती सेना’ (Shiv Shakti Sena) या पक्षाच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी राज्यातील प्रश्नासंदर्भात बोलताना म्हणाल्या, राज्यात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी आपण लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. राज्यातील अनेक कामे प्रलंबित असताना दुसरीकडे सरकारने मंत्र्यांच्या दालनावर 3600 कोटी आणि आमदार निवास बांधण्यासाठी 900 कोटी रुपयांचा खर्च करण्याचे ठरवले आहे. ते काम तातडीने बंद करण्याची मागणी करणार असल्याचे करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी सांगितले.

धनंजय मुंडेंवर आरोप
मुंडे पुढे म्हणाल्या, आमच्या पक्षाच्यावतीने राज्यभर दौरा सुरु केलेला आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असता माझे पती धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी माझी सभा रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, न डगमगता माझे कार्य पुढे सुरु ठेवणार आहे. आमच्या पक्षात अनेक संघटना तसेच इतर पक्षाचे लोकही प्रवेश करणार आहेत. यासाठी आमची चर्चा सुरु आहे. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली जाणार असल्याचे करुणा मुंडे यांनी सांगितले.

 

तिच्याकडे 3 कोटींच्या साड्या
मी राजकारणात (Politics) येऊ नये म्हणून माझे पती धनंजय मुंडे यांनी माझ्यावर दबाव (Pressure) टाकण्याचा प्रयत्न केला.
परंतु एकदा राजकारणात आल्यावर यू-टर्न घ्यायचा नाही, असे मी ठरवले आहे.
मी एकदम साधी राहणारी आहे. मंत्र्यांच्या बायका गाडीतून फिरतात. 25 हजारांच्या साड्या परिधान करतात.
धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीच्या कपाटात तीन कोटींच्या साड्या आहेत.
मात्र, माझ्याकडे पाच लाखांच्या देखील साड्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title :-  Karuna Munde | karuna munde will meet governor koshyari

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा