Karuna Sharma | धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी करूणा शर्मा अडचणीत; करूणा शर्मा यांच्याविरोधात परळी पोलिसांत गुन्हा दाखल…

परळी : पोलीसनामा ऑनलाईन – शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करूणा शर्मा (Karuna Sharma) यांच्याविरोधात फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमधील परळी पोलिस ठाण्यात (Parli Police Station) त्यांच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Karuna Sharma)

करूणा शर्मा यांनी काल धनंजय मुंडे (Dhanahjay Munde) यांच्या कार्यकर्त्याविरोधात तक्रार दाखल केली होती. शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला होता. मात्र ज्यांच्याविरोधात करूणा शर्मा यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी देखील काल परळी पोलिसांत (Parli Police) करूणा शर्मा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात त्यांच्याकडून देखील करूणा शर्मा यांच्यावर धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे.

यामध्ये, करूणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यासोबत अजय देडे (Ajay Dede) यांच्यावर परळी पोलिस स्टेशनमध्ये कलम ५०७ (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, करूणा शर्मा यांनी केलेले आरोप खोटे आहेत. जर ते आरोप खरे असतील, तर त्याचा पुरावा शर्मा यांच्याकडे असेल. तसेच, जर त्यांनी केलेले आरोप जर खरे निघाले तर मला भर चौकात फाशी द्या. असे बालाजी दहिफळे (Balaji Dahifale) म्हणाले.

पुढे बोलताना बालाजी दहिफळे म्हणाले की, ‘ माझ्यावर शर्मा यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे नाहीत.
मात्र त्यांनी दिलेल्या धमकीचे, शिवीगाळीचे माझ्याकडे पुरावे आहेत.
माझ्याकडे असलेले पुरावे मी पोलिस अधिकक्षकांना देणार आहे.
‘ असे बालाजी दहिफळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.
त्यामुळे बालाजी दहिफळे यांनी एकप्रकारे करूणा शर्मा यांना खुले आव्हानच दिले आहे.
अगोदरच, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि करूणा शर्मा यांचा वाद चालू आहे.
त्यात हे नवीन प्रकरण समोर आल्याने आता या वादाला नक्की कोणती दिशा मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे.

Web Title :- Karuna Sharma | a case has been registered against karuna sharma on the complaint of an activist of dhananjay munde in parli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | धक्कादायक! एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळले भीमा नदीपात्रात, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना

Bank Of Maharashtra Recruitment 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेगाभरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारिख