Karuna Sharma Allegations Against Dhananjay Munde | ‘कायद्यानुसार मी कोट्यावधी रुपयांची मालकीण…’, करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Karuna Sharma Allegations Against Dhananjay Munde | करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (NCP MLA Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप (Allegation) केले आहेत. मी ब्लॅकमेलर आहे की धनंजय मुंडे ब्लॅकमेलर आहेत याचे कागदपत्रे देईल. मी कायद्यानुसार कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे, असं म्हणत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आणखी आरोप केले. (Karuna Sharma Allegations Against Dhananjay Munde)

हरिश्चंद्राचा अवतार आहेत का?

धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या (Election) आधी जे प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर केलं त्यात धनंजय मुंडे खरं बोललात, हरिश्चंद्राचा अवतार आहेत का हे यावरुनच समोर येतं आसा टोला करुणा शर्मा यांनी लगावला. त्याच प्रमाणे हे प्रतिज्ञापत्र म्हणजे धनंजय मुंडे किती खोटारडे आहेत याचा एकप्रकारे पुरवाच असल्याचं देखील करुणा शर्मा म्हणाल्या. (Karuna Sharma Allegations Against Dhananjay Munde)

धनंजय मुंडे दोन बायकांचे पती

धनंजय मुंडे यांचे प्रतिज्ञापत्र दाखवत करुणा शर्मा म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी या प्रतिज्ञापत्रात पत्नींची संख्या लपवली आहे. कायदेशीररित्या ते दोन बायकांचे पती आहेत. ती माहिती लपवली आहे. तसंच मुलांची संख्या लपवली आहे. त्यांच्या विरोधात ज्या केसेस आहेत त्यांची संख्याही त्यांनी लपवली आहे. तसेच मुलांची संख्याही लपवली आहे. एवढी सगळी लपवालपवी केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ते निवडून कसे देतात? हेच मला समजत नसल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटलं.

मी आता शांत राहणार नाही

मी आत्तापर्यंत गप्प होते आता गप्प राहणार नाही. माझ्याविरोधात त्यांनी कोर्टाचा आदेश आणला होता की मी माध्यमांना काहीही माहिती देऊ शकत नाही आता मी शांत बसणार नाही. आज धनंजय मुंडे यांची याचिका दाखवते आहे. त्यात 1998 पासून मी आणि करुणा सोबत आहोत असं लिहिलं आहे. मात्र मी तुम्हाला सांगते आम्ही 1996 पासून सोबत राहात आहोत.

तेव्हा मी त्यांच्यासोबत होते

धनंजय मुंडे यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी आणि करुणा जगातल्या काही देशांमध्ये गेलो आहे. धनंजय मुंडे आजपर्यंत जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेले आहेत तेव्हा मी त्यांच्यासोबत होते. कारण त्यांच माझ्यावर तेवढं प्रेम होतं. मला धनंजय मुंडेंपासून दोन मुलं आहेत. माझ्या मुलांच्या आधार कार्ड, पॅन कार्डवर वडील म्हणून धनंजय मुंडे यांचं नाव आहे. माझ्या आधार कार्डवर, पासपोर्टवर त्यांचं नाव आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी असंही लिहून दिलं आहे की ती मुलं माझी आहेत. हे सर्व पुरावे बुधवारी करुणा शार्मा यांनी सादर केले.

मी कोट्यावधींची मालकीण

माझ्या नावावर एक कोटी रुपयांची पॉलीसी आहे. यामध्ये नॉमिनी म्हणून माझे पती धनंजय मुंडे यांचे नाव आहे.
मी ही पॉलिसी 1996 मध्ये काढली. तसेच माझा पासपोर्ट, आधार कार्डवर करुणा धनंजय मुंडे असं नाव आहे.
माझ्या मुलांच्या जन्म दाखल्यावर देखील त्यांचे नाव आहे. आज माझा मुलगा 19 वर्षांचा आहे.
त्यांना आजपर्यंत कुठलीही समस्या आली नाही. मात्र त्यांनी जेव्हा नीचपणाचा कळस गाठला तेव्हा मी पण
गप्प बसणार नाही, हे मी ठरवलं असल्याचे करुणा शर्मा यांनी सांगितले.

Web Title :- Karuna Sharma Allegations Against Dhananjay Munde | karuna sharma once again serious allegations against former minister dhananjay munde what she said

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

AFINDEX-23 | भारत- आफ्रिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव, AFINDEX-23 चा पुण्यात समारोप

Devendra Fadnavis On Girish Bapat | जमिनीशी नाळ असलेले राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपले! खा. गिरीश बापट यांना देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

MP Girish Bapat Passed Away | भाजप खासदार गिरीश बापटांच्या निधनानं राष्ट्रवादीच्या नेत्याला अश्रू अनावर, सांगितल्या जुन्या आठवणी