Karuna Sharma Arrested | पुणे पोलिसांकडून करूणा शर्मासह दोघांना मुंबईतून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Karuna Sharma Arrested | करुणा शर्मा-मुंडे (Karuna Sharma) हिला येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात आज सकाळी अटक (Arrested) केली. तिला मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी एका 23 वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली. या महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिचे पती व करुणा शर्मा यांना अटक (Karuna Sharma Arrested) केले आहे.

 

हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सोमवारी रात्री येरवडा पोलीस ठाण्याचे एक पथक मुंबईला रवाना झाले होते. त्यांनी आज सकाळी करुणा शर्मा व फिर्यादी यांचा पती यांना मुंबईतील घरातून ताब्यात घेऊन पुण्यात आणले आहे. दोघांना अटक करुन आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav) यांनी सांगितले. (Karuna Sharma Arrested)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे उस्मानाबाद येथे रहायला होते. त्यांना एक मुलगी आहे. नोव्हेबर 2011 मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा हिच्याबरोबर झाली. ती स्वत:ची ओळख करुणा मुंडे अशी करुन देते. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. सतत करुणा शर्मा हिच्याशी बोलत असत. तिने विचारणा केल्यावर तो त्यांचा छळ करु लागला. मी करुणाबरोबर लग्न करणार आहे. तू मला घटस्फोट दे, असे सांगून फिर्यादीला त्यांच्या आईच्या घरी सोडले. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांच्या घरी येऊन फिर्यादीवर पतीने बळजबरी केली.

 

दरम्यान, 24 एप्रिल रोजी तिला कार्यक्रमाला जायचे असे सांगून भोसरीला नेले.
तेथे करुणा शर्मा हिने हॉकी स्टीकचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
पतीच्या शोधासाठी त्या 3 जून रोजी मुंबईतील सांताक्रुझ येथील ग्रीन इमारतीत करुणा शर्मा हिच्या घरी नेले.
तेथे तिच्या पतीने करुणा शर्मा हिला फोन लावला. तिने जातीवाचक शिवीगाळ करुन पतीला घटस्फोट दे, नाही तर जीव गमवावा लागेल,
अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Karuna Sharma Arrested | Karuna Sharma arrested for atrocity Both were taken into custody from Mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा