Karuna Sharma | धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढण्याच्या घोषणेवरून करुणा शर्मा म्हणाल्या…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Karuna Sharma | करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी काही दिवसांपुर्वी शिवशक्ती सेना (Shiv Shakti Sena) या नव्या पक्षाची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पंरतु आज राज्याचा दौरा घेत असताना संगमनेरमधून (Sangamner) सुरूवात केली. त्यावेळी मात्र करुणा यांनी आपण स्वत: कधीही कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर मुलालाही राजकारणात आणणार नाही, मात्र भविष्यात त्याची इच्छा असेल तर मी अडविणार नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

 

30 जानेवारी 2022 रोजी नगरमध्ये मेळावा घेऊन शिवशक्ती सेना या पक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचं करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी म्हटले होते. तसेच, गरज पडल्यास बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे त्यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली होती. दरम्यान संगमनेरमध्ये (Sangamner) असताना आपण स्वत: कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ‘आपल्या मुलालाही आपण आताच राजकारणात आणणार नाही. पण, शेवटी त्याच्या अंगातही राजकारण्याचे रक्त आहे.
त्यामुळे भविष्यात त्याला वाटले तर तो राजकारणात येऊ शकतो. तेव्हा मी त्याला अडविणार नाही.
मी त्याची आई आहे, मालकीण होऊ उच्छित नाही,’ असं देखील त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘मी परखडपणे विचार मांडते म्हणून माझे सोशल मीडिया अकाऊंट निलंबित करण्यात आले. त्यातून मी 40 लाख लोकांपर्यंत पोहोचत होते. माझ्यासारख्या महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर इतरांची काय अवस्था असेल? हे सर्व थांबविण्यासाठी लढा देण्याची गरज आहे. आज संगमनेरचा पहिलाच दौरा होता. अशाच पद्धतीने राज्यभर फिरून नव्या पक्षाला पांठिबा मिळविणार आहे, असं करुणा शर्मा-मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title :- Karuna Sharma | karuna sharma munde in ahmednagar sasy will not fight election in parali

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona | चिंताजनक! पुण्यातील ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात तब्बल 2757 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rakesh Jhunjhunwala चा ‘हा’ स्टॉक पोहचला ऑल-टाइम हाय ! पुढे काय आहे शक्यता? जाणून घ्या

 

Pimpri Corona | चिंतेत भर ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1000 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी