3 ‘फुल’ एक ‘माळी’ ! तिघी सख्ख्या बहिणींनी ठेवलं ‘करवा चौथ’ एकाच पुरूषासाठी, चर्चेला उधाण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुवारी देशभरात विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुषासाठी करवाचौथ व्रत ठेवले होते आणि रात्री चंद्राला पाहून मगच पाणी पिले. परंतू मध्यप्रदेशात सतना जिल्ह्यात तीन सख्या बहिणींनी त्यांच्या आनोख्या पद्धतीने करवाचौथ साजरी केली, कारण या तिघींचे पती एकच व्यक्ती आहे आणि या तिघींनी सामूहिक पद्धतीने व्रत ठेवले आणि पूजा अर्चना केली.

सोशल मिडियावर शुक्रवारी एका फोटो वेगाने व्हायरल झाला. या फोटोमध्ये तीन महिला एकत्र करवाचौथ साजऱ्या करताना दिसल्या, असे सांगण्यात येत आहेत की या तिघी देखील बहिणी आहेत, या तिघांनी हातात चाळण घेऊन आपल्या जोडीदाराचा चेहरा पाहिला.

मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशाच्या सीमावर स्थित असलेल्या चित्रकूटच्या लोढवाराच्या काशीराम कॉलनीत राहणाऱ्या कृष्णा यांची जवळपास 12 वर्षापूर्वी तीन सख्या बहिणी शोभा, रीना आणि पिंकी यांच्याबरोबर लग्न केले होते. त्यानंतर तिघी बहिणी एकत्र राहायला लागल्या. तिघींचे दोन दोन मुलं आहेत.

इतर विवाहित महिलांसारखेत या तिघी बहिणींनी करवाचौथचे निरजल व्रत ठेवले होते आणि संध्याकाळी चंद्र उगवल्यावर आपल्या पतीचा चेहरा पाहिला. तिन्ही बहिणींनी पूर्ण श्रृंगार करुन पतीची पूजा केली, या क्षणाची फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

शक्यतो करवाचौथच्या फोटोमध्ये एक महिला आपल्या पतीचे पूजन करते, परंतू तीन महिला एकत्र पतीची पूजा करणं हे चर्चेचे कारण ठरले. यामुळे करवाचौथ निमित्त याची चर्चा सोशल मिडियावर होत होती.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या