‘या’ पठ्ठ्याला ‘घर’वाली आणि ‘बाहर’वाली बरोबर ‘करवा चौथ’ साजरा करण्याचा प्रयत्न पडला महागात

पोलीसनामा ऑनलाइन टीम – करवा चौथच्या दिवशी दोन बायका आणि फजिती ऐकाचे नाट्य लोकांना पहायला मिळाले. पाच वर्षापासून आपल्या प्रेमिकेबरोबर राहणारा पती आपल्या पत्नीकडे पोहचला, पत्नी तिच्या पतीला चंद्रात पाहत असताना तेथे पतीची प्रेमिका पोहचली.

प्रेमिकेने त्याला त्याच्या पत्नीबरोबर रंगेहाथ पकडले. दोन्ही महिलांचा आपापसात वाद झाला. हे पाहून लोकांची गर्दी झाली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले आणि पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ही घटना एत्माद्दौलाच्या नुनिहाई भागात घडली, या तरुणाला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. पाच वर्षांपूर्वीपासून या मजूराचे संबंध लोहामंडईच्या महिलेबरोबर होते. तो त्या महिलेबरोबरच राहू लागला. तो त्यांच्या पत्नीकडे जात नव्हता. परंतू तो करवाचौथ निमित्त पत्नीकडे पोहचला, याची माहिती त्याच्या प्रेमिकेला लागली. ती मागच्या दाराने घरात शिरली, तिचे म्हणणे होतो की तिने तिच्या प्रियकरासाठी व्रत ठेवले होते. त्यामुळे ती देखील करवाचौथ येथेच साजरी करणार.

दुसरीकडे मजूराची पहिली पत्नी देखील करवाचौथ साजरी करण्यावर अडून राहिली. यामुळे दोन्ही महिलांनी एकमेकांनी अर्वाच्य शिवीगाळ देखील केली. हे पाहून आसपासचे लोक जमा झाले, त्यांनी पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक यांनी संगितले की आरोपी तरुणाविरोधात शांती भंगाची कारवाई करण्यात आली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी