करवा चौथच्यापुर्वी केला पतीचा खून, मृतदेह घराबाहेर फेकल्यानंतर झोपण्यास गेली पत्नी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील हरदोईमध्ये करवा चौथच्या दोन दिवस आधी आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घराच्या बाहेर फेकून देण्यात आल्याची घटना घडली आहे. पति पत्नींमध्ये होत असलेल्या वारंवार भांडणाला आणि अनैतिक संबंधांना विरोध करत असल्यामुळे हत्या केली. हत्या केल्यानंतर ती आरामात आपल्या खोलीत जाऊन झोपली. सकाळी मृतकाच्या भावाने मृतदेह पाहिल्यानंतर हि घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या आपल्या पतीला सुरुवातीला तिने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर विटेने त्याचे डोके ठेचून त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने मृतदेह घराच्या बाहेर फेकून दिला. यावेळी घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना सुरुवातीला मृतकाच्या पत्नीवर शंका आली. त्यावेळी तिच्याकडे चौकशी केली असता तिने सर्व घटना सांगितली. ३४ वर्षीय नुरी हिला त्यानंतर पोलिसांनी आपला पती आशिक हुसैन याच्या हत्याप्रकरणात अटक केली. तिने दिलेल्या माहितीनुसर, तिचा पती तिला सारखा रोकटोक करत असे, त्यामुळे त्रासून तिने आपल्या पतीची हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी तिला या प्रकरणात अटक केली असून सध्या ती पोलीस कोठडीमध्ये आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

Loading...
You might also like