Kasara Ghat Accident | घाट उतरत असताना क्रूझरचा अपघात; एका मुलीचा मृत्यू तर 7 जण जखमी

कसारा : पोलीसनामा ऑनलाइन – Kasara Ghat Accident | नाशिक – मुंबई मार्गावरील (Nashik-Mumbai Highway) नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंटच्या पुढे असलेल्या वळणावर क्रूझरचा अपघात (Kasara Ghat Accident) झाल्याची धक्कादायक घटना घडली. या मार्गावर जालना हून मुंबईकडे जाणारी भरधाव क्रूझर (Cruiser) घाट उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीवर जोरात धडकली. या अपघातात एका मुलीचा मृत्यू (Died) तर सात जण जखमी (Seven injured) झाले आहेत.

 

दर्शना विजय कांबळे (Darshana Vijay Kamble) (वय 11, रा. मंठा, जि. जालना) असं अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. तर, लिलाबाई लिंबाजी राठोड (Lilabai Limbaji Rathod) (वय 30 वर्ष रा. मालेगाव), लिंबाजी राठोड (Limbaji Rathod) (वय, 40 वर्षे रा . मालेगाव), विठ्ठल चव्हाण (Vitthal Chavan) (वय, 45), जयश्री गजानन पवार (Jayashree Gajanan Pawar) (वय, 34), अनवी गजानन पवार (Anvi Gajanan Pawar) (वय, 1 वर्ष), कल्पना राजेश जाधव (Kalpana Rajesh Jadhav) (वय, 30), शामराव चव्हाण (Shamrao Chavan) (वय, 60 सर्व रा. वसई) हे सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Kasara Primary Health Center) उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. (Kasara Ghat Accident)

याबाबत माहिती अशी की, नाशिक – मुंबई मार्गावर जालनाहून मुंबईकडे जाणारी क्रूझर ही भरधाव वेगात कसारा घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीवर धडकली. दरम्यान, या घटनेची माहिती समजताच टोल पेट्रोलिंग टीम, महामार्ग पोलीस घोटी केंद्र, कसारा पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्य घटनास्थळी मदतीला दाखल झाले. या प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात (Kasara Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

 

Web Title :- Kasara Ghat Accident | cruiser accident in kasara ghat one girl was killed and seven others were injured

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा