कसारा घाटालगत भिषण अपघात, दोन महिला ठार

कसारा : पोलीसनामा आॅनलाईन

सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमरास मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटानजीक असलेल्या लतिफवाडी गावाजवळ भिषण अपघात झाला असून, यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. सितापतितिल नारायण कुटी (वय, ६१ ) आणि सुशिला पुल्लयोग सुब्रमंण्यम (वय, ६५ रा.कुर्ला. मुंबई) अशी ठार झालेल्‍या माहिलांची नावे आहेत. एका भरधाव टॅंकरने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या कारला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8fa931f0-a471-11e8-8cbb-3fa6a87ad041′]

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुबंईहून नाशिककडे निघालेली एक कार (MH 02 EP 9119) चहा घेण्यासाठी लतिफवाडी जवळ असलेल्या ढाब्यावर थांबली असताना, गाडी बाहेर ऊभे राहून सतीपतितिल कुटी आणि सुशिला सुब्रमंण्यम या चहा पित होत्या. यावेळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारा टॅंकर (GJ.12.AZ.6051) भरधाव वेगात असल्याने टॅंकर चालकाचा ताबा सुटला व टॅंकरने कारला धडक देऊन उभ्या असलेल्या दोन्ही महिलांनाही धडक दिली. अपघात एवढा भयंकर होता की यामध्ये या दोन्ही महिला 50 फुट फरफडत गेल्या. या विचित्र अपघातात सितापतितिल आणि सुशिला यांचा जागीच मृत्‍यू झाला तर, अन्य दोघे जण जखमी झाले. जखमी दोघांना तात्‍काळ जवळच्या रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

सदरच्या अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन ग्रुपचे सदस्य पिक इनफ्रा पेट्रोलींगचे सदस्य तात्काळ घटणास्थळी पोहचले व मदत कार्याला सुरूवात केली. यानंतर काही वेळातच कसारा पोलीस व महामार्ग पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंदण जाधव, पोलिस उपनिरीक्षक डगळे पुढील तपास करित आहेत.

इतर बातम्या

औरंगाबाद  : भाजपच्या ‘त्या’ ५ नगरसेवकांना अटक

डॉक्टरची आठ लाखाची फसवणूक 

Loading...
You might also like