‘कसौटी जिंदगी की’मधील ‘या’ अभिनेत्रींचे ‘ते’ फोटो व्हायरल 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कसौटी जिंदगी की 2 मधील लिडच्या अभिनेत्री एरिका फर्नांडिस, हिना खान आणि पूजा बॅनर्जी टीव्हीमध्ये नेहमीच हेवी मेकअप, ज्वेलरी आणि डिझायनर कॉस्ट्युममध्ये दिसतात. परंतु या तिनही स्टार्सना मोनॉकनी, बिकीनी घालून स्विमिंग पुलाच्या किनारी हॉलिडे एन्जॉय करताना क्वचितच कोणी पाहिले असेल.

एरिका, हिना खान आणि पूजा बॅनर्जी यांची स्विमिंग पूलावरील मस्ती करतानाचा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. कसौटी जिंदगी की मधील प्रेरणाचा रोल करणाऱ्या एरिका फर्नांडिसने हा फोटो शेअर केला आहे तसेच हिना खाननेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे.

फोटोंमध्ये दिसत आहे की, एरिकाने ब्लॅक मोनॉकनी, हिना खानने बिकीनी घातल्याचे दिसत आहे. पूलाच्या किनारी समर एन्जॉय करताना कसौटी जिंदगी की स्टार कास्टचा बोल्ड लुक चाहत्यांना विशेष आवडताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अशाही बातम्या समोर आल्या होत्या की, हिना खान आणि एरिका एकमेकांना खास काही पसंत करत नाहीत. कसौटीच्या सेटवरील दोघींमध्ये शीत युद्ध सुरु असतं. परंतु समोर आलेल्या या फोटोने मात्र कोल्ड वॉर केवळ अफवा असल्याचं सिद्ध केलं आहे.

रिपोर्टनुसार, हिना खान लवकरच या शोमधून जाणार आहे. सिनेमातील प्रोजेक्टमध्ये बिजी असल्या कारणाने हिना खान ही मालिका सोडत आहे.