Kasba by-Election | कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार, नावांची यादी नाना पटोले हायकमांडला पाठवणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kasba by-Election | कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पोटनिवडणूक (Kasba by-Election) जाहीर केली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु असताना महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेस (Congress) कसबा विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली असून उमेदवारांची नावे ठरली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) ही नावे दिल्ली हायकमांडला पाठवणार आहेत.

 

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Assembly Constituency) आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक (Maharashtra By-Election) होणार आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुक जाहीर केली आहे.

काँग्रेसकडून कसबा मतदार संघासाठी (Kasba by-Election) पाच जणांची नावे ठरली आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ राहिला आहे. या मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी संगीता तिवारी (Sangeeta Tiwari), बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar), कमल व्यवहारे (Kamal Vyavaye), अरविंद शिंदे (Arvind Shinde) आणि रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे इच्छुक उमेदवार आहेत. या उमेदवारांनी नाना पटोले यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thope) यांची पक्षाच्या निरीक्षक पदी नियुक्ती केली आहे.

 

असा असेल पोटनिवडणुकीचा कार्यक्रम
अधीसूचना जारी करण्याची तारीख – 31 जानेवारी 2023
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख – 7 फेब्रुवारी 2023
दाखल अर्जांची छाणणी – 8 फेब्रुवारी 2023
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2023
मतदानाची तारीख – 27 फेब्रुवारी 2023
मतमोजणीची तारीख – 2 मार्च 2023

 

Advt.

Web Title :- Kasba by-Election | 5 congress candidates in discussion for kasba assembly by-election pune news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Homemade Rice Scrub | हिवाळ्यात वापरा घरी तयार केलेले हे ४ राईस स्क्रब, स्किनवर येईल ‘ग्लो’

Health Tips | रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका या 5 वस्तू, आरोग्याला होऊ शकते हे मोठे नुकसान

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान