Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Kasba By-Election) जाहीर झाली असून 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसबा पोटनिवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) लढवणार असल्याचे संकेत मिळाल्याने भाजपने (BJP) निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूक (Kasba By-Election) आम्ही बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.

कसबा पोटनिवडणूक (Kasba By-Election) बिनविरोध करण्याचा प्रस्ताव तुमच्यापर्यत आल्यावर काय भूमिका
घेणार असा प्रश्न नाना पटोले यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला.
यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राची एक परंपरा राहिली आहे.
कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला तर ती निवडणूक बिनविरोध करण्याचे काम काँग्रेसने केले आहे.
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत आल्यावर
ती बिनविरोध केली होती.

प्रस्ताव काय येतो त्यावर…

परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात पंढरपूर, देगलूर, कोल्हापूर यासह अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत संबंधित कुटुंबातील व्यक्तीला भाजपने विरोध केला. त्यामुळे भाजपचा नेमका प्रस्ताव काय येतो, पण अद्याप प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे प्रस्ताव काय येतो त्यावर आपण बोलू, अशी भूमिका नाना पटोले यांनी
मांडली.

आमचा मास्टर प्लॅन तयार

कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. उमेदवारांची रीघ लागली असून आठ ते दहा जणांचे अर्ज माझ्याकडे आले आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे 1980 पर्यंत प्राबल्य होते.
हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आणण्यासाठी आमचा मास्टर प्लॅन तयार असून त्यावर काम सुरु आहे.
येत्या 3 किंवा 4 फेब्रुवारीला आमच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करु, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Web Title :- Kasba By-Election | nana patole comment on kasba by election candidate says we will talk about bjp proposal comes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | ‘बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्याचा त्यांना अधिकार नाही,’ या आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी घेतला चांगलाच समाचार; म्हणाले…

Health Tips | 2023 मध्ये पूर्णपणे बदलून जाईल आरोग्य, डाएट प्लानमध्ये या 4 फूडचा करा समावेश

Jalgaon ACB Trap | 25 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात