Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kasba Bypoll Election Result | संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली. या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरीचा अपवाद वगळता हेमंत रासणे यांना एकदाही धंगेकर यांच्याविरुद्ध निर्णायक आघाडी घेता आली नाही.

 

कसब्यातील ही लढत धंगेकर (Ravindra Dhangekar) विरुद्द रासने यांच्यात झाली. सोळाव्या फेरीत धंगेकर यांनी निर्णायक आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. या पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll Election Result)महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे 11 हजार मतांनी विजयी झाले आहेत.

गेल्या 28 वर्षापासून भाजपच्या हातात असलेल्या या मतदार संघात काँग्रेसने इतिहास घडवला आहे. रविंद्र धंगेकर यांच्या रुपाने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) भाजपवर मोठा विजय मिळाल्याचं दिसून येत आहेत. यापूर्वी 1992 च्या निवडणुकीत कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. 2009 मध्येही कसब्यात रविंद्र धंगेकरांनी गिरीश बापट (Girish Bapat) यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, यंदाच्या पोटनिवडणुकीत भाजप विरोधात असलेली नाराजी रवींद्र धंगेकरांच्या पथ्यावर पडली. त्यातच शिवसेनेचे (Shivsena) चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला दिल्याने नाराज शिवसैनिकांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेऊन धंगेकर यांचा प्रचार केला होता. याचा देखील फायदा धंगेकर यांना झाला आहे.

सामन्यांचे नेते म्हणून धंगेकरांची ओळख

रवींद्र धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदार संघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत.
त्यामुळे कसब्यातील काही भाग सोडला तर इतर प्रभागांमध्ये रवींद्र धंगेकरांची चांगली पकड आहे.
तसेच त्यांची सामान्यांचे नेते म्हणून ओळख आहे. त्यामुळे कसब्यात हेमंत रासने (Hemant Rasane)
विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी जोरदार लढत बघायला मिळणार हे सुरुवातीपासूनच ठरलं होतं.
काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी कसब्यात ऐतिहासिक विजय मिळवत भाजपचा पारंपारिक मतदारसंघ हिसकावला आहे.

 

 

Web Title :- Kasba Bypool Election Result | In the BJP’s Balekil, Congress’ Music,
Ravindra Dhangekar of Congress won by 11,000 votes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा