Kasba Constituency Bypolls | जाणून घ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे शिक्षण आणि संपत्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील कसबा (Kasba Constituency Bypolls) आणि चिंचवड (Chinchwad) मतदारसंघाची पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. सत्ताधारी भाजपबरोबरच (BJP) महाविकास आघाडी (MVA) देखील या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी या दोन्ही उमेदवारांनी आपली संपत्ती तसेच शिक्षणाचा तपशील निवडणुक आयोगापुढे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात दिला आहे. (Kasba Constituency Bypolls)

या उमेदवारांनी निवडणुक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांची एकूण संपत्ती १० कोटी ५१ लाख रूपयांची आहे. तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची एकूण संपत्ती ७ कोटी २० लाख रूपये इतकी आहे. या दोन्ही उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या आयकर विवरण पत्रात कोरोनाकाळानंतर या दोन्ही उमेदवारांची संपत्ती घटल्याचे समोर आले आहे.

हे दोन्ही उमेदवार पुण्यातील मध्यवर्ती भागातील रहिवासी असून त्यामुळे त्या भागातील घर, जमीन यांच्या किमती अधिक आहेत. या दोघांचाही व्यवसाय शेती आणि रियल इस्टेट आहे. हेमंत रासने यांचे शिक्षण १२ वी आहे. तर रवींद्र धंगेकरांचे शिक्षण ८ वी आहे. या दोन्ही उमेदवारांकडे ग्रामीण भागात शेती आणि बिगरशेती जमीन आहे. (Kasba Constituency Bypolls)

हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर या दोघांमागे देखील पुण्याच्या मध्यवर्ती भागातील गणेश मंडळांची ताकद आहे.
दोघांनीही याअगोदर तीन वेळा पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणुन काम केले आहे.
त्यामुळे या दोघांमध्ये काँटे की टक्कर होणार. असे स्थानिक मतदार म्हणत आहे.

गेल्या काही निवडणुकांपासून कसबा विधानसभा मतदारसंघातील गणिते पूर्णपणे बदलल्यामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून ब्राम्हणेतर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

Web Title :- Kasba Constituency Bypolls | know about property of bjp congress candidate hemant rasane ravindra dhangekar kasaba pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chinchwad Bypoll Election | सहानुभूती आणि राजकारण वेगळं, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार; नाना काटेंची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Aurangabad Crime News | धक्कादायक! आईने झोपेतच पोटच्या मुलांचा घेतला जीव; औरंगाबाद हादरलं