Kasba Peth Assembly Election 2024 | ‘हिशोबात राहा, निवडणूक झाल्यावर दाखवू’, हेमंत रासनेंकडून मनसे उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना धमक्या; गणेश भोकरेंनी दिला इशारा; म्हणाले – ‘… तर थेट रासनेंच्या ऑफिसवर धडकणार’ (Video)

Kasba Peth Assembly Election 2024 | 'Be accountable, we will show you after the election', threats from Hemant Rasan to MNS candidate's workers; Ganesh Bhokare warned; He said - '... then will directly hit the office of Rasen' (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Kasba Peth Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आता कसबा विधानसभा मतदारसंघातील जनता कोणाला कौल देते? याबाबत अनेकांची मतमतांतरे आहेत. दरम्यान हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर, महायुतीकडून हेमंत रासने (Hemant Rasane) तर मनसेकडून गणेश भोकरे (Ganesh Bhokare) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात मनसे उमेदवार गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभाही नुकतीच पार पडली. दरम्यान हा मतदारसंघ आणखी एका प्रकाराने चर्चेत आला आहे.

मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी हेमंत रासने यांचे नाव न घेता धमकी दिल्याचा आरोप केला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचे त्यांनी समाज माध्यमावरील एका व्हिडिओत म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असा उल्लेख त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये केला आहे. मला जर अजून धमक्या आल्या तर मी थेट रासने यांच्या ऑफिसवर धडकणार असल्याचा इशारा गणेश भोकरे यांनी दिला आहे.

गणेश भोकरे म्हणाले, ” राज ठाकरे यांच्या सभेनंतर विरोधकांच्या पायाखालची माती सरकली आहे, म्हणून सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराकडून माझ्या सहकाऱ्यांना धमक्या येत आहेत. कसली भाषा करत आहेत, हिशोबात राहा निवडणूक झाल्यावर दाखवू अशा प्रकारच्या धमक्या येत आहेत.

माझ्या सहकाऱ्यांना धमक्या द्यायच्या आधी या गणेश भोकरेला भिडा, मी एकटा नाही. माझ्या मागे सर्व मित्र परिवार आहे आणि गोरगरीब जनता आहे, जे काही करायचं आहे ते समोर येऊन करा. तुम्ही सांगेल त्या ठिकाणी यायला मी तयार आहे”, असे भोकरे यांनी व्हिडिओमध्ये म्हंटले आहे.

Total
0
Shares
Related Posts