Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची उडी, टिळक कुटुंबीय उतरल्यास निवडणूक बिनविरोध?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि भाजप नेत्या (BJP Leader) मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक (Kasba Peth Bypoll Election) जाहीर झाली आहे. यासाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून दोन मार्चला मतमोजणी होणार आहे. ही पोटनिवडणूक (Kasba Peth Bypoll Election) बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) उडी घेतली आहे. ही जागा काँग्रेसकडून लढविण्यात येऊ शकते.

कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्या महिन्यात निधन झाले. या रिक्त झालेल्या जागी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) निवडणूक जाहीर केली आहे. कसबा पेठ (Kasba Peth Bypoll Election) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही मतदारसंघात बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठी भाजपकडून निश्चित प्रयत्न होतील. परंतु महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने याठिकाणी मतदान होण्याची शक्यता आहे.

कसब्यातून भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) , मुलगा कुणाल (Kunal Tilak) यांचा विचार होण्याची शक्यता आहे. टिळक कुटुंबाऐवजी इतरांना संधी द्यायची झाली तर स्थायी समितीचे (Standing Committee) माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane), माजी सभागृह नेते गणेश बीडकर (Ganesh Bidkar), धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. कसब्यात महाविकास आघाडीच्या जुन्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा काँग्रेसला जाते. या जागेवर काँग्रेसकडून (Congress शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच रोहित टिळक (Rohit Tilak) हे देखील पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तसेच ठाकरे गटाकडून (Thackeray Group) संजय मोरे (Sanjay More), विशाल धनवडे (Vishal Dhanwade) तर राष्ट्रवादीकडून (NCP) रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) हे इच्छूक आहेत.

काँग्रेसकडून कसब्याची निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल.
यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिले आहेत.
त्यामुळे काँग्रेस कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे,
असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी सांगितले.

कसब्याची पोटनिवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray)
पक्ष लढवण्यास इच्छुक आहे. मात्र यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील,
असे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule),
पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे या निवडणुकीबाबत निर्णय घेतली.
त्यांच्या निर्णयानंतरच चित्र स्पष्ट होईल. निवडणूक झाली तर भाजपच विजयी होईल असा विश्वास मुळीक
यांनी व्यक्त केला.

Web Title :- Kasba Peth Bypoll Election | tilak family likely unopposed in kasba peth assembly constituency elections pune news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | मित्रासोबत फोनवर बोलत राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Pune Cyber Crime News | गॅस रेग्युलेटर बसत नाही, गुगलवरील कस्टमर केअरचा सल्ला पडला पावणे सहा लाखांना, ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

PM Narendra Modi In Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची भिंत तोडल्यामुळे विद्यार्थी आक्रमक; म्हणाले…