काशी-महाकाल एक्सप्रेस ! बोगी नंबर-5, सीट नंबर-64, ‘महाकाल’ बाबांसाठी रिझर्व, PM मोदींनी दाखवला हिरावा झेंडा

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी महाकाल एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. प्रवाशांना अध्यात्मिक अनुभवासाठी ही महाकाल एक्स्प्रेस असणार आहे. महाकाल एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक बी -5 मधील सीट क्रमांक 64 भगवान महाकाल (शिवा) साठी आरक्षित असेल. या ट्रेनच्या एका सीटचे रुपांतर छोट्या मंदिरात झाले आहे. रविवारी पंतप्रधान मोदींनी रिमोटच्या माध्यमातून ही ट्रेन चंदौलीच्या पडावं येथून रवाना केली.

20 फेब्रुवारीपासून वाराणसीहून इंदौरकडे जाणाऱ्या काशी-महाकाल एक्स्प्रेसमध्ये आठ वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचे पॅकेजही असेल. आयआरसीटीसीने वाराणसी, अयोध्या, प्रयागराज, इंदूर, उज्जैन, भोपाळ येथील धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे पॅकेजही तयार केले आहे. महाकाल एक्स्प्रेसमधील धार्मिक प्रवाशांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यामध्ये प्रवाशांच्या मनोरंजन व आध्यात्मिक भावनेसाठी भजन-कीर्तनही आयोजित करण्यात आले आहे. सुरुवातीच्या दिवशी, एक मंडळी भजन – कीर्तन करेल. यानंतर सतत कॅसेट्च्या माध्यमातून अनाऊंसमेंटच्या माध्यमातून भजन-कीर्तन ऐकायला मिळेल.

या दिवशी धावणार महाकाल एक्स्प्रेस :
ही गाडी वाराणसी येथून मंगळवार आणि गुरुवारी आठवड्यातून दोन दिवस धावेल. लखनौ, कानपूर, बीना, भोपाळ, उज्जैन मार्गे ते इंदौरला पोहोचेल. बुधवारी आणि शुक्रवारी इंदौर, उज्जैन, संत हिरडाराम नगर (भोपाळ), बीना, कानपूर आणि लखनऊ वाराणसीला जातील. रविवारी वाराणसी-इंदूरमार्गे अलाहाबाद-कानपूर-बीना ट्रेन धावणार आहे. दर सोमवारी इंदूर, उज्जैन, संत हिरडाराम नगर, बीना, कानपूर, अलाहाबाद वाराणसीला पोहोचेल.

धार्मिक प्रवाशांसाठी वेगवेगेळे पॅकेजेस :
मिळालेल्या माहितीनुसार, एकाचे काशी दर्शन पॅकेज 6010 रुपये असेल, ज्यात वाराणसी घाट, काशी विश्वनाथ मंदिर, संकट मोचन मंदिर, दशाश्वमेघ घाट येथे गंगा आरतीचा समावेश आहे. काशी दर्शन 2 चे पॅकेज 8110 रुपये असेल, ज्यामध्ये सारनाथचे दर्शनही जोडले जाईल. काशी-प्रयाग दर्शनाची किंमत 10 हजार 50 रुपये असेल, ज्यामध्ये काशी दोनची ठिकाणे असलेल्या प्रयागचा संगम किनारा असेल.

आयआरसीटीसी पर्यटन व विपणन संचालक रजनी हसीजा यांनी सांगितले की, इंदौर, भोपाळ किंवा उज्जैन वाराणसीहून येणाऱ्यांसाठी एकूण पाच पॅकेजेस सुरू करण्यात आली आहेत, तर वाराणसी, अलाहाबाद आणि लखनऊहून जाणाऱ्यांना चार पॅकेजेस देण्यात येत आहेत. पॅकेजमध्ये, प्रवासी मंदिरे आणि पर्यटनस्थळांना थांबणे, खाणे आणि भेट देण्याची व्यवस्था केली जाईल. ही पॅकेजेस ऑनलाईन घेता येतील. या व्यतिरिक्त जर ट्रेनमध्ये प्रवास करणारे इतर प्रवासी देखील एकाच वेळी पैसे देऊन पॅकेजमध्ये सामील होऊ शकतात.

You might also like