खरच भारताशी युध्द करण्याच्या स्थितीत आहे का पाकिस्तान ? तिजोरीत ‘खणखणाट’ अन् डोक्यावर कर्जाचा ‘डोंगर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृ्त्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर मोदी सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तान सतत भारताला युद्धाच्या धमक्या देत आहे. काश्मीर प्रश्न प्रत्येक व्यासपीठावर उचलून धरण्यासाठी  पाकिस्तानने प्रयत्न केला पण त्याला कोठूनही पाठिंबा मिळाला नाही. यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापारी संबंध तोडण्याची घोषणा केली.

image.png

गुरुवारी (दि 29 ऑगस्ट) रोजी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी फिट इंडियासाठी मंत्र देत होते तेव्हा पाकिस्तान गझनवी क्षेपणास्त्राची चााचणी करत जगाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अनेकदा आण्विक युद्धाची धमकी दिली आहे.

image.png

मंगळवारी पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी ट्विट करत लिहिलं होतं की, “इम्रान खान भारतासाठी एअरस्पेस पूर्ण बंद करण्याबाबत विचार करत आहे. पाकिस्तानी नागरिकांनीही भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकत आर्थिक नुकसान करण्याबाबतही अपील केलं आहे. पाकिस्तान भारताला अशावेळी आर्थिक नुकसान पोहोचवण्याबाबत धमकी देत आहे जेव्हा त्याची स्वत:ची अवस्था खूप वाईट सुरु आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान काश्मिरींसोबत एकता दाखवण्यासाठी काश्मिरी अवरचे आयोजन करीत अर्ध्या तासासाठी सर्व कामे थांबवून रस्त्यावर उतरण्याची विनंती करीत आहेत. तेदेखील देशाच्या अर्थव्यवस्थेची एक रुपयाचा महसूल गमावण्याची क्षमता नसताना.

image.png

पाकिस्तानी पत्रकार गुल बुखारी यांनी काश्मीरी अवर आयोजनावर टीका केली की, “आयएमएफ (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) खूप खुश असेल कारण पंतप्रधान प्रत्येक आठवड्यात अर्धा तास कामकाज थांबण्याचे आदेश देत आहेत. यामुळे आपली उत्पादकता वाढेल. आपला महसूल वाढेल आणि आपण आयएमएफ कर्जाची परतफेड करू शकू.

image.png

पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्करापुढे कुठेच टिकत नाही, याशिवाय आर्थिक स्तरावरही त्याची अवस्था अशी नाही की, त्याने युद्धाच्या धमक्या द्याव्यात.

image.png

विश्व बँकच्या मते पाकिस्तानचा जीडीपी 2018 च्या शेवटी 254 अरब डॉलर होता. तर भारताचा जीडीपी 2.84 ट्रिलियन होता. म्हणजे भारताची एकूण अर्थव्यवस्था ही पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या 11 पट आहे. जर 2019 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 7 टक्के राहिला तर एका वर्षात त्यात 200 अरब डॉलरची भर पडेल जी पाकिस्तानच्या 2018 मधील एकूण जीडीपीच्या 80 टक्क्यांच्या बरोबर असेल.

image.png

पाकिस्तानचा आर्थिक विकास दर हा 4.3 टक्क्यांच्या हळू गतीने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) च्या मते 2019 आणि 2020 मध्ये पाकचा विकास दर 3 टक्क्यांहूनही कमी असणार आहे. त्यामुळे पाकसाठी अधिकच भीषण परिस्थिती होत आहे ज्यामुळे पाकला महागाईचा सामना करावा लागत आहे. मे 2019 मध्ये पाकिस्तानात महागाई दर 9 टक्क्यांच्या विक्रमी पातळीवर होता.

image.png

पाकिस्तानी सरकारी बजेट आर्थिक तूटीच्या समस्येशी झगडत आहे. पाक वारंवार कर्ज घेत आहे. एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या अर्थसंकल्पातील तूट जीडीपीच्या 8.9 टक्क्यांपर्यंत पोचली आहे, जी गेल्या तीन दशकांतील सर्वाधिक आहे. कमकुवत अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तानच्या चलनाचा विनिमय दर विक्रमी पातळीवरही पोहोचला आहे. मे महिन्यात पाकिस्तानी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 140च्या पातळीवर होता. याच आठवड्यात डॉलरच्या तुलनेत  पाकिस्तानी रुपयाची किंमत 157 वर पोहोचली आहे.

image.png

चीनपासून सौदी अरब पर्यंत पाकने कर्ज घेतले आहे. मार्च 2019 मध्ये पाकचं एकूण कर्ज 85 अरब डॉलर(6 लाख कोटी) पेक्षाही अधिक झालं आहे. चीन आणि सौदीशिवाय पाकने इतरही आंतरराष्ट्रीय संस्थांचे दरवाजे ठोठावले आहेत. मे महिन्यात पाकने 23 व्या वेळी आयएमएफचा दरवाजा ठोठावला होता आणि 6 अरबचं बेलआऊट पॅकेज अनेक कठिण अटींवर मिळवलं होतं. आयएमएफची अट आहे की, पाकला आपल्या महसूलात 40 टक्के वाढ करावी लागणार आहे.

image.png

पाकला कसा मिळेल दिलासा ?

जुलै महिन्यात आयएमएफने पाकला चांगलंच फटकारलं होतं. आयएमएफने म्हटलं होतं की, पाकिस्तानची अर्थव्यवस्था गंभीर अवस्थेत आहे. कमकुवत आर्थिक धोरणे, रेकॉर्ड बजेटची तूट, सैल चलन धोरण, अतिरीक्त विनिमय दराची बचत, अल्प मुदतीच्या विकास दरामुळे पाकिस्तानवरील कर्ज वाढले आणि परकीय चलन साठा कमी होत आहे.

image.png

इतकेच नाही तर या संस्थेने पाकिस्तानच्या स्ट्रक्चरल कमकुवतपणाचादेखील उल्लेख केला आहे. आयएमएफने पाकिस्तानातील टॅक्सला घेऊन कमकुवत प्रशासन, व्यवसायासाठी प्रतिकूल परिस्थिती, तोट्यात चाललेल्या सरकारी एंटरप्रायजेस यांसारख्या समस्यांनाही अधोरेखित केले आहे.

image.png

पाकिस्तानच्या या आर्थिक दुर्दशेला त्याची अपारदर्शक राजकीय व्यवस्था जबाबदार आहे जी लष्कराच्या इशाऱ्यावर चालते. आर्थिक संकटात असताना पाकिस्तानातील नेते आता भारताविरुद्ध युद्धाच्या धमक्या देण्यात व्यस्त आहे.

आरोग्यविषयक वृत्त –