LOC जवळ हिमस्खलनात 3 जवान शहीद, 1 बेपत्ता ; 5 नागरिकांचे जीव वाचवण्यात यश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर काश्मीरमध्ये रविवारी बर्फवृष्टी झाली. त्यामुळे सोमवारी अनेक ठिकाणी हिमस्खलन झाले. माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ या हिमस्खलनात सैन्याची चौकी बर्फाखाली गेली. या घटनेत बर्फाखाली 3 जवान शहीद झाले. तर एक अजूनही बेपत्ता आहे. मध्य काश्मीरमध्ये गांदरबल जिल्ह्यात हिमस्खलनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला. यात दोन मुलांचा आणि त्यांच्या वडीलांचा समावेश आहे.

सैन्याकडून सांगण्यात आले की, रामपूर आणि गुरेज सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या कारणाने सैनेच्या चौकीचे नुकसान झाले. तेथे देखील एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. बर्फात अडकलेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी वायुसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत. बर्फाचे प्रमाण जास्त असल्याने कुपवाडा, बांदीपोरा आणि बारामुल्ला जिल्ह्यात अनेक घरांचे नुकसान झालेले आहे. उत्तर आणि मध्य काश्मीरमध्ये आणखी बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सैन्याला 4 जणांचे जीव वाचवण्यात यश 
गांदरबल जिल्ह्यात कुल्लन भागात सोमवारी रात्री बर्फाचा डोंगर कोसळल्याने बर्फाच्या ढिगाऱ्याखाली 9 जण अडकले होते. त्यानंतर जवानांच्या प्रयत्नाने अनेकांना बाहेर काढण्यात आले, तेथून 4 जणांना सुरक्षित वाचवण्यात आले. तर 5 जणांचा जीव गेला. यापूर्वी बारामुल्ला जिल्ह्यात गुलमर्गमध्ये दोन लहान मुली हिमस्खलनाखाली अडकल्या होत्या, त्यांची देखील सुखरुप सुटका करण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा –