कलम ३७० हटवण्यापुर्वी PM मोदींनी आखला होता ‘हा’ प्लॅन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या निर्णयासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य करत हा निर्णय खूप विचारविनिमय करून घेतल्याचे सांगितले. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी यासंदर्भात अनेक प्रकारची माहिती देत हा निर्णय काश्मीरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे देखील स्पष्ट केले.

काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यामुळे राज्यात रोजगार, गुंतवणूक वाढेल आणि स्थानिकांची प्रगती होईल. त्यामुळे देशातील इतर राज्यांप्रमाणे काश्मीरच्या विकासालाही वेग येईल याबाबत मी आश्वासक असल्याचे देखील मोदींनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

काश्मीरसाठी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरणाची निर्मिती :
मोदींनी सांगितले की,’देशभरातील अनेक उद्योगपतींनी माझ्याकडे काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली असून अशी गुंतवणूक होणे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गरजेचे आहे. मात्र गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि पोषक वातावरण असणे जेणेकरून बाजार स्थिर चालेल आणि कायदा-सुव्यवस्था सुरळीत असेल. कलम ३७० हटविल्यानंतर आता त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील.’ खुले विचार आणि अर्थव्यवस्था क्षेत्र युवकांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत करतील कारण आजच्या घडीला आर्थिक विकास बंद दरवाजाआड होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अशा प्रकारे साधला जाईल विकास :
खुल्या गुंतवणुकीच्या धोरणामुळे जम्मू काश्मीरात पर्यटन, शेती, आयटी आणि आरोग्य या क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना मिळू शकेल. युवकांना शैक्षणिक संधी प्राप्त होऊन या परिसरात त्यांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण केला जाईल. शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयटीआय, आयआयएम, एम्स अशा संस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. जम्मू काश्मीरमध्ये जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्याचे काम सरकार प्राधान्याने करेल. रस्ते, नवीन रेल्वे मार्ग, एअरपोर्ट असे विकासाचे प्रकल्प याठिकाणी लवकरच आणणार असून या राज्याचा विकास झाल्यास त्याला देश आणि परदेशाशी जोडण्यास मदत होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. निर्णयामुळे राज्यातील युवकांचे कौशल्य, मेहनत आणि उत्पादनासाठी चांगले परिणाम घडलेले येणाऱ्या काळात पाहायला मिळतील अशी आशा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like