370 कलम हटवल्यानंतर पाक क्रिकेटर आफ्रीदीची ‘बोंबाबोंब’, गौतम गंभीर म्हणाला, ‘बेटा चिंता करू नकोस – गप्प बस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानमधून विविध प्रतिक्रिया येत असून यामध्ये पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याने ट्विटरवर भाष्य केल्यानंतर त्याला भारताचा माजी क्रिकेट खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने खडे बोल सुनावले. या दोघांमध्ये ट्विटरवर मोठ्या प्रमाणात जंग पाहायला मिळाली.

शाहिद आफ्रिदी याने भारताने घेतलेल्या या निर्णयाला मानवाधिकाराचे उल्लंघन म्हटल्याने या दोघांमध्ये हे ट्विटरवॉर सुरु झाले. आफ्रिदीने हे ट्विट केल्यानंतर त्याला उत्तर देताना गौतम गंभीर याने म्हटले कि, आफ्रिदी अगदी बरोबर बोलला आहे. त्याने उचललेल्या या पावलाचे मी स्वागत करतो, त्याचबरोबर त्याचे अभिनंदन देखील करायला हवे. मात्र तो हे विसरत आहे कि, मानवाधिकारांचं उल्लंघन पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहे. आम्ही आमच्या प्रदेशातील गोष्ट बघू त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमधील प्रश्नाविषयी देखील आम्ही लवकरच निर्णय घेऊ. त्याचबरोबर आफ्रिदीने संयुक्त राष्ट्रसंघावर देखील नाराजी व्यक्त करत युएन झोपले आहे का? असा प्रश्न विचारला. त्याचबरोबर त्याने ट्विटमध्ये म्हटले की, काश्मीरमधील लोकांना देखील संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार अधिकार मिळायला हवेत. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघाने यामध्ये लक्ष देण्याची मागणी देखील त्याने केली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देखील यामध्ये लक्ष घालण्याची त्याने मागणी केली.

दरम्यान, काल गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर राज्यसभेत हा प्रस्ताव मंजूर देखील झाला. यामुळे जम्मू काश्मीर राज्याचा विशेष राज्याचा दर्जा जाणार असून जम्मू काश्मीर हा यापुढे केंद्रशासित प्रदेश असणार आहे. त्याचबरोबर यापुढे राज्यात सर्व केंद्राचे कायदे लागू होणार आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकार याठिकाणी मोठे प्रकल्प राबवून राज्याच्या विकासात हातभार लावणार असल्याचे देखील गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणादरम्यान म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त –